ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रत्नागिरीत काँग्रेस भुवनाला टाळे

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 11:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

रत्नागिरीत काँग्रेस भुवनाला टाळे

शहर : रत्नागिरी

          जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गंत वाद पुन्हा चव्हाटय़ावर आले आहेत. रत्नागिरीतील काँग्रेस भुवनला जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्या हुकुमावरून टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांना व्हरांडय़ातच ताटकळत राहण्याची वेळ आली. पक्ष कार्यालय उघडण्यासाठी चाव्याही मागवण्यात आल्या, मात्र त्या न मिळाल्याने या पदाधिकाऱयांनी परतीचा रस्ता धरल. 


        रत्नागिरीतील काँग्रेस कार्यकारिणीत नव्या जिल्हाध्यक्ष निवडीनंतर वादाला तोंड फुटलेले आहे. जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अंतर्गंत कुरूबुरींना वेग आला आहे. पदाधिकारी बदलावरुन हा वाद आणखीनच वाढला आहे. कोणताही निर्णय घेताना जिल्हाध्यक्ष रत्नागिरी शहरातील कार्यकर्त्यांना विचारात घेत नसून मनमानी कारभार करत असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. 


        तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर यांनी तर जिल्हाध्यक्षांना थेट आव्हान देत जो पद देतो त्यांनाच पदावरुन बाजूला करण्याचा अधिकार आहे. पदाधिकारी बदलण्याची त्यांची भूमिका चुकीची असून त्यांनाच पदावरुन दूर करण्याची  मागणी पत्रकार परिषदेद्वारे केली होती. रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत पाठिंब्यावरुनही दोन मतप्रवाह होते. शहरातील एका गटाने शिवसेनेला पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली होती. मात्र जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.


         काँग्रेसमध्ये हे गटातटाचे राजकारण सुरु असताना गुरुवारी त्यात आणखीनच भर पडली आहे. काँग्रेसचे जिल्हा मुख्यालय असलेल्या काँग्रेस भुवनला जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्या हुकूमावरून कुलूप लावण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काँग्रेस भवन पक्ष कार्यासाठी हवे असल्यास त्यांनी कामाचे स्वरुप सांगून संबधित व्यक्तींकडून चावी घ्यावी अशी नोटीस भोसले यांच्या नावाने दरवाजांवर लावण्यात आली आहे. हा प्रकार पाहून गुरुवारी सकाळी प्रदेश सरचिटणीस तथा माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर व लांजा, राजापूर, संगमेश्वर मधून आलेल्या 30 ते 35 कार्यकर्त्यांना ताटकळत बाहेर उभे राहावे लागले.
 

मागे

नववर्षात रेल्वे तिकीट दरवाढ होणार?
नववर्षात रेल्वे तिकीट दरवाढ होणार?

          नवी दिल्ली - भारतीय रेल्वेच्या सर्व तिकीट दरांच्या किमतीत वा....

अधिक वाचा

पुढे  

पाटणच्या तरुणाचा चिपळुणमध्ये मृत्यू 
पाटणच्या तरुणाचा चिपळुणमध्ये मृत्यू 

           माकडांना बिस्कीट देताना तोल गेल्याने सुमारे दोनशे फूट दर....

Read more