By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 03:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या अयोध्यातील राम जन्मभूमी वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मध्यस्थ समितीने अहवाल सादर केला. तेव्हा या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी व अंतिम अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने मध्यस्थ समितीला 31 जुलै पर्यंत मुदत दिली आहे. त्यानतर 2 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता खुल्याकोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत मध्यस्थ समितीतर्फे तोडगा काढायचा की या प्रकरणावर रोज सुनावणी करायची यावर निर्णय घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
एक पक्षकार गोपालसिंह विशारद यांनी अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी मध्यस्थ समितीमार्फत या प्रकारांवर अंतिम तोडगा निघण अत्यंत कठीण दिसत असल्याचे म्हटले होते. तसेच ही समिती केवळ वेळकाढूपणा करीत असून न्यायालयाने स्वत: रोज सुनावणी करावी , अशी मागणीही विशारद यांनी केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला.
इस्रोने तांत्रिक अडचणीमुळे 15 जुलै ला मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी अवकाशात ....
अधिक वाचा