By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 12:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
अयोध्याप्रकरणी मध्यस्थी प्रक्रियेच्या आदेशानंतर आज पहिल्यांदाच सुप्रिम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश एफएमआय खलीफुल्ला यांनी सुप्रिम कोर्टात अहवाल सादर करून मध्यस्थी प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ मागितली असता न्यायालयानेही खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीला तीन महिन्याची मुदतवाढ दिली आहे.
मार्च महिन्यात या घटनापीठाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वाद तोडग्यासाठी मध्यस्थीसाठी पाठवला होता. यासाठी कोर्टाने 3 सदस्यीय पॅनेलचीही स्थापना केली होती. या समितीत सुप्रिम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश एफ. एम. कलीफुल्ला यांच्यासह आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश होता. आज या समितीने कोर्टात एक अहवाल देऊन मध्यस्थीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याची वेळ मागून घेतली. मध्यस्थीची प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली हे आम्ही उघड करू शकत नाही. ही बाब गोपनीयच राहिली पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं. त्यावर कोर्टाबाहेर चर्चेद्वारे तोडगा काढण्याच्या प्रक्रियेचं आम्ही स्वागत करतो, असं ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सांगितलं. यावेळी मुस्लिम याचिकाकर्त्याने अनुवादावर आक्षेप घेतला. पाच वेळीची नमाज आणि जुमा नमाज यात फरक असल्याचं या याचिकाकर्त्याने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
ठाण्यातील ढोकळी नाका येथील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झेरिया परिसरात सेफ्टीक....
अधिक वाचा