ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2019 11:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

शहर : देश

ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाच्या निकालपत्राचे वाचन साडेदहा वाजता सुरू करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने याची सुनावणी केली. त्यानंतर आज त्याच्या निकालपत्रावर या सर्व न्यायाधीशांनी सह्या केल्या.

वादग्रस्त जागेवर शिया वक्फ बोर्डाचा मालकी हक्काचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच याठिकाणी असलेलं बांधकाम गैर इस्लामिक होतं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शिया वक्फ बोर्डाची याचिका पाचही न्यायाधीशांनी फेटाळली. सुन्नी वक्फ बोर्ड आणि राम लाल्ला  विराजमान यांचे दावे निकाली काढले जातील आणि दिलासा दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.

मंदिर आणि मशिदीच्या बांधकामामध्ये 400 वर्षांचं अतंर आहे. मुस्लीम त्या जागेला नमाज पठणाचे स्थळ मानतात तर त्या जागेवर प्रभू रामचंद्रांचा जन्म तिथं झाल्याची हिंदूंची श्रद्धा आहे असंही मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं.

अयोध्या प्रकरणात हिंदू पक्षाने अनेक ऐतिहासिक दस्ताऐवज सादर केले. हिंदूंनी केलेला दावा खोटा नाही. रामलल्लाचा ऐतिहासिक ग्रंथांमध्ये उल्लेख. याशिवाय चौथरा आणि सिता की रसोई याठिकाणी असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हिंदूंनी त्या जागेचे महत्त्व दर्शविण्यासाठी अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड आणि गॅझेटियर रेकॉर्ड दिले.केवळ विश्वास आणि श्रद्धा यांच्या जोरावर मालकी हक्क सांगता येणार नाही. सुन्नी वक्फ बोर्डाचा खटला कायम ठेवता येतो. परंतु प्रतिकूल ताबा मिळवण्याचा हक्क मुस्लिम सांगू शकत नाहीत. बाह्य अंगणात हिंदूंचा  ताबा आहे. मुस्लीमांना पर्यायी जागा देण्यात येणार असून काही अटी शर्तीच्या आधारावर हिंदूंना  जमीन  मिळेल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.

एएसआयच्या अहवालाबाबतही सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी केली. हा अहवाल अंदाज किंवा फक्त एक अंदाज म्हणून नाकारता येणार नाही. एएसआय क्रेडेन्शियल संशयाच्या पलीकडे आहे आणि याचा शोध दुर्लक्षित करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं.

एएसआयच्या अहवालात मूलभूत रचना विशिष्ट मंदिर असल्याचे म्हटले गेले नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. मीर बाँकीनं बाबरच्या काळात मशिद बांधली. याशिवाय एएसआयने इदगाहचा उल्लेख केलेला नाही. खोदकामात इस्लामिक ढाचा असल्याचे पुरावे आढळले नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

मुस्लिमांनी वादग्रस्त जमिनीचा संपूर्ण ताबा कधीही गमावला नाही याचा पुरावा आहे. तसेच मुस्लिमांनी नमाज बंद केला नाही किंवा संरचना सोडली नव्हती असंही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निकाल ; LIVE UPDATE

काही अटी शर्तीच्या आधारावर हिंदूंना  जमीन  मिळेल

बाहेरचा चौथरा,राम चौथरा,सीता की रसोईत पूजा होई- कोर्ट

जमीन संपादनाआधी तिथं मुस्लीम नमाज पढत होते- कोर्ट

आतील भागात नेहमी पूजा होत असे- कोर्ट

मशिद आणि कब्रस्तान असल्याचा मुस्लीम पक्षांचा दावा

सुन्नी वक्फ बोर्डाचा दावा विचार करण्यासारखा- कोर्ट

इथं 'सीता की रसोई' असल्याची हिंदूंची श्रद्धा-कोर्ट

मंदिर पाडून मशीद बनवल्याचा उल्लेख नाही- कोर्ट

एका रात्री मूर्ती ठेवली असा मुस्लिम पक्षाचा दावा- कोर्ट

आस्था आणि विश्वासावर कोणताही वाद होऊ शकत नाही- कोर्ट

हे रामाचं जन्मस्थान अशी हिंदूंची श्रद्धा-कोर्ट

आधीचं बांधकाम गैरइस्लामिक होतं- कोर्ट

वादग्रस्त जागेवर आधी बांधकाम होतं- कोर्ट

मोकळ्या जागेवर मशीद बांधली गेली नव्हती- कोर्ट

निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला

श्रद्धा आणि भावनेपेक्षा कोर्टाचं स्थान वरचं -कोर्ट

मध्ये दोन मूर्ती ठेवण्यात आल्या-कोर्ट

1949मध्ये दोन मूर्ती ठेवण्यात आल्या-कोर्ट

अयोध्याप्रकरणाचा आज सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक निर्णय

निकाल वाचनाला काही वेळातच सुरूवात

राममंदिरासाठी 3 महिन्यात ट्रस्ट स्थापन करा- कोर्ट

वादग्रस्त जागा रामलल्लाचीच -कोर्ट

केंद्राला ट्रस्ट स्थापन करण्याचे कोर्टाचे आदेश

सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जागा द्यावी - कोर्ट

वादग्रस्त 5 एकर जागा हिंदूंना मिळणार-कोर्ट

आतील भाग अद्यापही वादग्रस्त आहे - कोर्ट

मुस्लिमांना पर्यायी जागा देणार - कोर्ट

हिंदू पक्षानं बाहेरच्या जागेवर दावा सिद्ध केला - कोर्ट

प्राचीन यात्रेकरूंनी रामजन्मभूमीचा उल्लेख केलाय-कोर्ट

लोक मशिदीच्या घुमटालाच रामजन्मस्थान मानतात- कोर्ट

प्राचीन यात्रेकरूंनी रामजन्मभूमीचा उल्लेख केलाय- कोर्ट

सुन्नी वक्फ बोर्ड दावा सिद्ध करू शकले नाहीत- कोर्ट

मागे

'हे' 5 न्यायाधीश देणार अयोध्या खटल्या प्रकरणीचा ऐतिहासिक निर्णय
'हे' 5 न्यायाधीश देणार अयोध्या खटल्या प्रकरणीचा ऐतिहासिक निर्णय

अयोध्या खटल्या प्रकरणाचा ऐतिहासिक निर्णय आज 9 नोव्हेंबर रोजी सुनावण्यात ये....

अधिक वाचा

पुढे  

Ayodhya Verdict : वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Ayodhya Verdict : वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने द....

Read more