ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक- पंतप्रधान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 05, 2020 06:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक- पंतप्रधान

शहर : देश

राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहेराम मंदीराची प्रक्रिया राष्ट्राला जोडणारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. अयोध्येत श्रीराम मंदिर भुमीपूजन केल्यानंतर ते बोलत होते. राममंदीराचा शिलान्यास आज पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. अयोध्येचं अर्थतंत्र बदलेल, अनेक संधी उपलब्ध होतील. संपूर्ण जगातील लोक प्रभु रामाचं दर्शन घेण्यासाठी येतील. सर्वोच्च न्यायालयाने सर्वांच्या भावनांचा आदर राखत निर्णय दिला. ज्याप्रमाणे मावळ्यांनी छत्रपतींना साथ दिली, समाजातील सर्व वर्गाने गांधीजींना पाठींबा दिला त्याप्रमाणे आपण सर्वांनी मिळून राम जन्मभुमीचं कार्य पार पाडल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

महत्वाचे मुद्दे

अयोध्या नगरी जैन धर्माच्या आस्थेचे केंद्र

संपूर्ण भारत राममय झालाय.

राम भारतीय संस्कृतीचा आधार

रामाला मानणाऱ्यांचा विकास होतो

राम आधुनिकता आणि परिवर्तनाचे समर्थक

श्रीरामाच्या आदर्शावर भारत साकारायचा आहे.

जगभरातील रामायणांचा यावेळी पंतप्रधानांनी आवर्जुन उल्लेख केला. मुस्लिमबहुल इंडोनेशियातही रामाचे पूजन केले जात असल्याचे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यासाठी मोदी हे सकाळी अयोध्येत पोहोचलेत. त्यांनी हनुमानगढीवर जाऊन दर्शन घेतले आणि पूजा-आरती केली. त्यानंतर त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. भूमिपूजन समारंभात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा थाटात पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केले.

पीएम मोदी यांनी भगवान श्रीरामलल्लाला विराजमान केले. पंतप्रधान मोदी दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी केला. अयोध्येत भगवान राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रम सुरु झाला आहेराम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात चांदीचे फावडे आणि चांदीची कणी वापरण्यात आली आहे. त्यानंतर अयोध्येत भगवान राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रम झाला.

मागे

मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला, आजची गणपती वाहतूक बंद
मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला, आजची गणपती वाहतूक बंद

मुंबईमध्ये आज दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्या....

अधिक वाचा

पुढे  

Mumbai Rain | मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
Mumbai Rain | मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडत आहे. मुंबईत अवघ्या 5 तासात 300 म....

Read more