By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 22, 2024 01:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
विविध राज्यांनी मंदिराच्या उभारणीत जे योगदान दिलय, त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक भारत श्रेष्ठ भारत'ची धारणा स्पष्टपणे दिसून येते. महाराष्ट्राने सुद्धा राम मंदिराच्या निर्माणात महत्वाच योगदान दिलय, जाणून घ्या.
अयोध्येच्या राम मंदिरात रामललाची प्राण प्रतिष्ठा सुरु आहे. संपूर्ण देशात उत्सवाच वातावरण आहे. आज प्रत्येकजण दिवाळी साजरी करतोय. संपूर्ण देश रोषणाईने उजळला आहे. राम मंदिर उद्घाटनाचा फक्त देशातच नाही, तर परदेशातही मोठा उत्साह दिसून येत आहे. 500 वर्षांची प्रतिक्षा अखेर आज संपली. आजपासून भाविक राम मंदिरात जाऊन आपल्या प्रभूच दर्शन घेऊ शकतील. अयोध्येतील या राम मंदिराच्या उभारणीत सर्वसामान्य नागरिकांपासून विविध राज्यांनी मोठ योगदान दिल आहे. त्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
विविध राज्यांनी मंदिराच्या उभारणीत जे योगदान दिलय, त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची धारणा स्पष्टपणे दिसून येते. राम मंदिराच्या निर्माणात राजस्थान नागौरच्या मकरानाचा वापर झाला आहे. मकरानाच्या मार्बलपासूनच राम मंदिराच्या गर्भगृहात सिंहासन बनवण्यात आलय. या सिंहासानावर भगवान प्रभू रामचंद्र विराजमान होतील. भगवान श्रीराम यांच्या सिंहासनावर सोन्याचा मुलामा आहे. गर्भगृह आणि जमिनीवर मकरानाच सफेद मार्बल आहे. मंदिराचे खांब उभारणीसाठी सुद्धा मकराना मार्बलचा वापर झालाय.
गुजरातच योगदान काय?
मंदिरातील देवतांच्याी मुर्तींच कोरीवकाम कर्नाटकातील चर्मोथी बलुआ दगडावर करण्यात आलय. प्रवेशद्वारावरील आकृतीमध्ये राजस्थान बंसी पहाडपुर गुलाबी बलुआ दगडाचा वापर करण्यात आलाय. गुजरातकडून 2100 किलोग्राम अस्तधातु घंटी देण्यात आलीय. गुजरातच्या अखिल भारतीय दरबार समाजाकडून 700 किलोग्राम रथ भेट म्हणून देण्यात आलाय. भगवान श्रीरामांची मुर्ती साकारण्यासाठी काळा दगड कर्नाटकातून आला. अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरातून नक्काशीदार लाकडाचे दरवाजे आणि हाताने बनवलेलं फॅब्रिक्स आलय.
ही असंख्य शिल्पकार आणि कारागिरांची गोष्ट
कुठल्या राज्याने काय दिलं? ही यादी इथेच संपत नाही. पितळेपासून बनवलेली भांडी उत्तर प्रदेशातून आली आहेत. पॉलिश केलेल सागवान लाकूड महाराष्ट्रातून आलय. विटा जवळपास 5 लाख गावातून आल्या आहेत. अयोध्येतील राम मंदिर निर्माण ही असंख्य शिल्पकार आणि कारागिरांची गोष्ट आहे.
अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन होत आहे. हे मंदिर उभं राहण्यामागे मोठा ल....
अधिक वाचा