By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2019 11:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
अयोध्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशात कडकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता या खटल्याचा निकाल येणार असून संपूर्ण सुप्रीम कोर्ट परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Live Update...
11.06 - मुस्लीम वर्गाला दुसरी जागा देण्याच आदेश कोर्टाने दिले आहेत.
11.05 - रामाचा जन्म त्याच जागी झाला होता याचे पुरावे - कोर्ट
11.04 - 1885 पासून हिंदू चौथाऱ्यावर पूजा करत होते.
11.03 - हिंदू सीता स्वयंपाकघरातपूजा करत होते. - कोर्ट
11.01 - इंग्रजांच्या काळापर्यंत येथे नमाज वाचली जात होती असा पुरावा नाही - कोर्ट
11.00 - मुस्लीम पक्ष जमिनीवर एकाधिकार नाही सिद्ध नाही करु शकला.
10.55 - आस्था आणि विश्वासच्या आधारावर नाही तर कायद्याच्या आधारावर जमिनीची मालकी दिली जाईल - कोर्ट
10.52 - 12 व्या आणि 16 व्या शतकात काय होतं याबाबत कोणताही पुरावा नाही - कोर्ट
10.50 - मंदिर तोडून मशीद बनवण्यात आली याचा कोणताही पुरावा नाही- कोर्ट
10.49 - एएसआयच्या रिपोर्टनुसार मशीदच्या जागी आधी मंदिर होतं असं देखील निर्णयात म्हटलं गेल्याचं कळतं आहे.
10.47 - आस्था आणि विश्वासवर कोणताही वाद नाही होऊ शकत - कोर्ट
10.46 - जमीन विवादाच्या आधारे कायद्यानुसार निर्णय दिला जाईल - कोर्ट
10.45 - रामाचा जन्म अयोध्येत झाला याबाबत कोणताही वाद नाही. - कोर्ट
10.42 - बाबरी मशीद ही रिकाम्या जागी बनवली नसल्याचं कोर्टाने निर्णयात म्हटलं आहे. याचा अर्थ बाबरी मशीदच्या आधी त्या ठिकाणी मंदिर होतं. असं देखील सुनावणीत म्हटलं असल्याचं कळतं आहे.
10.38 - निर्मोही आखाड्याचा दावा ही कोर्टाने फेटाळला आला आहे.
10.31 - शिय्या वफ्फ बोर्डाची याचिका फेटाळण्यात आली आहे.
10.28 - अयोध्या निकालाच्या निर्णयाची प्रत सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे.
10.27 - केंद्रीय होम सेक्रेटरी अजय भल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी पोहोचले आहेत. सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठक
10.25 - सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अब्दूल नजीर, अशोक भूषण हे खंडपीठ आज या प्रकरणात निकाल देणार आहेत. सरन्यायाधीशांसह सर्व न्यायमूर्ती निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेत. काही वेळातच निकाल येईल अशी अपेक्षा आहे.
10.20 - सरन्यायाधीश रंजन गोगाई कोर्टात पोहोचले.
9.50 - अयोध्या प्रकरणावर निकाल देणारे पाचही न्यायाधीश कोर्टात दाखल.
9.45 - सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या कोर्टाबाहेर वकिलांची गर्दी.
अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणीच्या खटल्याचा बहुप्रतिक्षित न....
अधिक वाचा