ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बाबरी विध्वंसप्रकरणी आज निकाल, 11 वाजता निकाल वाचनाला सुरुवात

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 10:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बाबरी विध्वंसप्रकरणी आज निकाल, 11 वाजता निकाल वाचनाला सुरुवात

शहर : देश

बाबरी खटल्यावर सीबीआय(CBI) चे विशेष न्यायालय आज (बुधवारी 30 सप्टेंबर) निकाल देणार आहे. या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, कल्याण सिंह यांसारख्या मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण 32 जण आरोपी आहेत. सकाळी 11 वाजता या निकालाचे वाचन सुरु होईल. लखनौमधील कोर्टात हा निकाल सुनावलं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांचे वय 75 वर्षांहून अधिक आहे, त्या आरोपींना निकालावेळी प्रत्यक्ष हजर राहण्याची मुभा न्यायलयाने दिली आहे.

मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण 32 जण आरोपी

या प्रकरणी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साघ्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडेय, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादूर सिंह, संतोष दूबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडेय, अमर नाथ गोयल, जयभान सिंह पवैया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आरएन श्रीवास्तव, आचार्य धमेंद्र देव, सुधीर कुमार कक्कड़ आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर हे सर्वजण आरोपी आहेत.

आरोपींना 5 वर्षांची शिक्षा

याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्यास, आरोपींना जास्तीत 5 वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते

एकूण 48 आरोपी, त्यातील 17 जणांचे निधन

भाजपा, शिवसेना, विश्व हिंदू परिषद तसेच इतर साधू-संत मिळून एकूण 49 आरोपी आहेत. यातील 17 आरोपींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे

निकाल देणारे न्यायधीश आज निवृत्त होणार

बाबरी खटल्यावर सीबीआय(CBI) चे विशेष न्यायालयात निकाल दिला जाणार आहे. हा निकाल देणारे न्यायधीश सुरेंद्र कुमार आज निवृत्त होणार आहे. या प्रकरणातील सुनावणी आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोर्टाच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

लखनौमध्ये बाबरी खटल्यावर निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने कोर्टाच्या परिसरात जवळपास दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. तर संवेदनशील जिल्ह्यात आरपीएफ तैनात करण्यात आली आहे

27 वर्षांपासून सुरू होता खटला, 17 आरोपींचा मृत्यू

बाबरी खटल्यावर मागच्या तीन वर्षांपासून सलग सुरु असलेला युक्तीवाद 1 सप्टेंबरला संपला. न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव या खटल्यावर बुधवारी (24 सप्टेंबर) निकाल देणार आहेत. या खटल्यात भाजपा, शिवसेना, विश्व हिंदू परिषद तसेच इतर साधू-संत मिळून एकूण 49 आरोपी आहेत. यातील 17 आरोपींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 5 ऑक्टोबर 1993 ला तपास करुन या सर्व 49 आरोपींवर सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं होतं.

मागे

इतरांसाठीही मुंबई लोकल प्रवास सुरु करण्याबाबत विचार करा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना
इतरांसाठीही मुंबई लोकल प्रवास सुरु करण्याबाबत विचार करा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी नव्हे तर इतरांनाही मुंबई लोकलमधू....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनानंतर महाराष्ट्रावर नव्या विषाणूजन्य रोगाचं सावट, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचा इशारा
कोरोनानंतर महाराष्ट्रावर नव्या विषाणूजन्य रोगाचं सावट, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचा इशारा

देशात सध्या करोना रोगाचे सावट असतानाच आता क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर ....

Read more