ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Babri Case | बाबरी विध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 12:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Babri Case | बाबरी विध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त

शहर : देश

उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद उद्धस्त केल्यानंतर २८ वर्षानंतर लखनऊमध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. निकाल वाचन सुरु झाले आहे. घटना पूर्व नियोजीत नव्हती, असे निकाल वाचन करताना सांगत न्यायाधीश सुरेंद्र यादव यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, उमा भारती, महंत नृत्यगोपाल दास वगळता इतर २६ आरोपी न्यायालयात हजर होते.दरम्यान, या निकालानिमित्ताने विशेष न्यायालय परिसरातली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. १९९२ मध्ये अयोध्येत रामजन्मभूमी आंदोलनात बाबरी मशिद पाडण्यात आली होती. डिसेंबर १९९२ या दिवशी वादग्रस्त बाबरी मशिदचा विध्वंस केल्याची घटना घडली होती.

२७ ऑगस्ट १९९३ पासून सीबीआय या प्रकरणी तपास करीत आहे. ही घटना म्हणजे सुनियोजीत कट असल्याचं सीबीआयने तपासात म्हटलं होतं. सीबीआयने ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्र पुरावा म्हणून सादर केले आहेत. १९ एप्रिल २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.

 

मागे

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, दहावीतील विद्यार्थिनीचा गळफास
ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, दहावीतील विद्यार्थिनीचा गळफास

कोरोनामुळे सरकारने ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र ऑनलाईन शिक्षण....

अधिक वाचा

पुढे  

28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द
28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द

बाबरी विद्ध्वंस प्रकरणाचा (Babri Demolition Case) निकाल देणारे सीबीआयच्या विशेष न्यायाल....

Read more