ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माफी मागा अन्यथा तोंड काळ करु, बच्चू कडुंचा 'या' मंत्र्याला इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2020 11:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

माफी मागा अन्यथा तोंड काळ करु, बच्चू कडुंचा 'या' मंत्र्याला इशारा

शहर : अमरावती

मागील काही दिवसांपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान आदी राज्यातील हजारो शेतकरी हे केंद्र सरकारच्या कृषी कायदा विरोधात दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करीत आहे. दरम्यान या शेतकऱ्यांना कृषी कायद्याला विरोधच करायचा आहे तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांनी केलं. या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय.

केंद्रीय मंत्री रतनलाल कटारीया यांच्या या वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला असून रतनलाल कटारीयांनी तात्काळ या शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा त्यांचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा ईशारा राज्यमंत्री बच्चू कडु यांनी दिला आहे.

यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले रतनलाल कटारिया हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. आणि त्यांनी शेतकऱ्यांबाबत हे वक्तव्य करणं चुकीचे आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी मरायची भाषा वापरत असालं तर मग आम्ही तुम्हाला मारायसाठी यायचं का ? असा सवाल बच्चू कडू यांनी केलाय.

एकतर शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीसाठी प्रतिसाद न देणे त्यांना सहानुभूती देण्याऐवजी तुम्ही जर त्यांना मारण्याची भाषा करत असाल तर आम्हाला आंदोलन सोडून तुम्हाला कुठं पाठवायाच हे ठरवावे लागेल असे ते म्हणाले.

रतनलाल कटारिया यांनी आता शेतकऱ्यांची तात्काळ माफी मागितली पाहिजे अन्यथा आम्ही त्यांचं तोंड काळ केल्याशिवाय राहमार नाही ईशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलाय.

 

मागे

MDH च्या धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन
MDH च्या धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

एमडीएचच्या (MDH)प्रत्येक जाहिरातीत दिसणारे आजोबा धरमपाल गुलाटी (Mahashay Dharampal Gulati) या....

अधिक वाचा

पुढे  

CBSE परीक्षा ऑनलाइन घेण्यास नकार; लेखी परीक्षा होणार
CBSE परीक्षा ऑनलाइन घेण्यास नकार; लेखी परीक्षा होणार

देशात कोरोना व्हायरस या महामारीचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या परीक्षांना....

Read more