ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई मेट्रो तीन प्रकल्पातील भुयारीकरणाचा तेरावा टप्पा पूर्ण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2019 01:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई मेट्रो तीन प्रकल्पातील भुयारीकरणाचा तेरावा टप्पा पूर्ण

शहर : मुंबई

मेट्रो तीन प्रकल्पातील भुयारीकरणाचा तेरावा टप्पा आज पूर्ण झाला. एमएमआरसीअंतर्गत मेट्रोच्या प्रस्तावित विधानभवन स्थानकाजवळचं भुयारीकरण पूर्ण झालंय. कफपरेड मेट्रो स्थानकापासून ते विधानभवन हे सव्वा किलोमीटरचं भुयारीकरण २०५ दिवसात पूर्ण करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो ही शहरामधील जलद परिवहन रेल्वे प्रणाली आहे. मुंबई महानगरामधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय तसेच सद्य मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी मुंबई मेट्रोचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार अनेक मेट्रो प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. घाटकोपर ते वर्सोवा असा पहिला टप्पा सुरु झाला. त्यानंतर अनेक टप्पे सुरु करण्यात आले आहे.जून २००६ मध्ये भारताचे पंतप्रधान, श्री. मनमोहन सिंह, यांनी या प्रणालीच्या पहिल्या भागाचे भूमिपूजन केले. मेट्रोची वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या पहिल्या मार्गिकेचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी करण्यात आले.

 

मागे

जम्मू-काश्मीरमध्ये दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश
जम्मू-काश्मीरमध्ये दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश

जम्मू-काश्मीरमध्ये दोन आणखी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करा....

अधिक वाचा

पुढे  

दादरमधील चित्रा चित्रपटगृह बंद करू नका', अन्यथा तीव्र आंदोलन करू, शिवसेनेचा  इशारा
दादरमधील चित्रा चित्रपटगृह बंद करू नका', अन्यथा तीव्र आंदोलन करू, शिवसेनेचा इशारा

'दादरमधील चित्रा चित्रपटगृह बंद करू नका', अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशा....

Read more