By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 16, 2019 02:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना असणारी बंदी पाक सरकारने उठविली आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून भारतीय विमाने प्रवास करू शकणार आहेत. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडून याबाबत एयरमेन (एनओटीएम) नोटिस जारी केली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर २६ फेब्रुवारीला भारताने पाकच्या बालाकोट भागावर हवाई हल्ला केला होता. तेव्हापासून पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना प्रवासासाठी बंदी घातली होती. त्यामुळे एअर इंडियासह अन्य विमान कंपन्यांना एकूण ५४८ कोटी रूपयांचा तोटा झाला होता. अनेक आंतरराष्ट्रीय विमान्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. आता हे हवाई क्षेत्र खुले केल्याने भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिर्डीत ३ दिवस चालणार्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरवात झाल....
अधिक वाचा