By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 02:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आधीच शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी जागा देण्यात आली आहे. त्यानंतर आता या ठिकाणचा केरळीय महिला समाजाच्या ताब्यात असलेला मोकळा भूखंड स्मारकाच्या व्यासाला देण्यात येणार आहे. हा भूखंड 362 चौ. कि. एवढा आहे त्या बदल्यात केरळी महिला समाजाला प्रभादेवी येथील आयटी पार्कच्या जागेत 81 चौ. मी. जागा देत त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील नगर भू क्रमांक 501, 502 पैकी आणि नगर भू क्रमांक 1495 धारण करणाऱ्या महापौर निवासाची जागा आणि इतर वापरात असलेल्या सुमारे 11 हजार 551.01 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा शासनाने स्थापन केलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाला 30 वर्षाच्या भाडेपट्ट्याने 1 रुपया प्रति वर्षी नाममात्र दराने मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. त्यात आता आणखी केरळीय महिला समाजाच्या ताब्यातील भूखंड दिला जाणार आहे
संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्ष मारिया फर्नाडा एस्पिनोसा यांनी भारताच....
अधिक वाचा