ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

…. तर मुंबईचं महापौरपद काँग्रेसकडेच, बाळासाहेब थोरातांनी दंड थोपटले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2020 07:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

…. तर मुंबईचं महापौरपद काँग्रेसकडेच, बाळासाहेब थोरातांनी दंड थोपटले

शहर : मुंबई

राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका आघाडीने एकत्र लढवल्या आणि चांगलं यशही मिळवलं. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हि तिन्ही पक्ष आघाडी म्हणून मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकाही एकत्र लढेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता आघाडीतील या तिन्ही पक्षांमधून स्वबळाचीही भाषा येऊ लागलीय. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आगामी मुंबई महापौर काँग्रेसचाच असेल असं म्हणत दंड थोपटले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या आवाजाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक गाजणार आहे. काँग्रेस यंत्रणेने सर्व ताकद लागली तर मुंबई महापौर होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. सरकार आले, त्यात काही प्रश्न आहेत. नसीम खान यांना सांगतो काँग्रेस पक्ष श्रेष्ठ आहे. त्याचा सन्मान राखण्यात कधीच तडजोड नाही. अशोक चव्हाण आणि मी हक्काने याबाबत विषय मांडू.”यावेळी बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. तसेच मुंबईचा‌ महापौर काँग्रेसचा झाला पाहिजे, असं कार्यकर्त्यांना आवाहन केलं.

अशोक चव्हाण म्हणाले, “भाजपला थांबवण्यासाठीच महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. आघाडी सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामवरच चालेल. सोनिया-राहुल गांधी यांच्या विचार आणि भूमिकेवर सरकार चालेल.” अशोक चव्हाण यांनी यावेळी शिवसेनेला अप्रत्यक्ष इशाराही दिला. भाजपचा “सामाना करायचा आहे हे विसरू नका. अन्यथा, दोन हात सामना आम्हीही करू. भाई जगताप तुम्ही दोन हात करायला कमी पडू नका, आम्ही ताकद देवू, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.

मागे

यंदा घरीच साधेपणानेच नववर्षाचे स्वागत करा, राज्य सरकारकडून 31 डिसेंबरसाठी मार्गदर्शक सूचना जारी
यंदा घरीच साधेपणानेच नववर्षाचे स्वागत करा, राज्य सरकारकडून 31 डिसेंबरसाठी मार्गदर्शक सूचना जारी

जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. अनेक ....

अधिक वाचा

पुढे  

TRP Scam : अर्णब गोस्वामींकडून BARC च्या माजी सीईओला लाच, मुंबई पोलिसांचा कोर्टात दावा
TRP Scam : अर्णब गोस्वामींकडून BARC च्या माजी सीईओला लाच, मुंबई पोलिसांचा कोर्टात दावा

TRP घोटाळ्यात जामिनावर सुटलेले रिपब्लिक चॅनलचे (Republic Channel TRP Scam) संपादक अर्णव गोस्....

Read more