By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2019 03:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : virar
विरार-वसईतील तुंगारेश्वर डोंगरावरील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमावर तोडक कारवाई सुरू करण्यात आल्याने संतप्त झालेल्या भाविकानी या कारवाईच्या निषेधार्थ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. घोडबंदरवरील फाऊंटन हॉटेलजवळ करण्यात आलेल्या या आंदोलनात मीरा, भाईदर, वसई-विरार, ठाणे या ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे मुंबई व गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
या संदर्भात अधिक माहिती अशी की कारवाईची दिलेली मुदत संपत आल्याने वन विभागने हालचाली सुरू केल्या. बुधवारपासून 3 हजार पोलिस तुंगारेश्वर डोंगरानजीक तैनात करण्यात आले होते. काल गुरुवारी वन विभागाच्या अधिकार्यानी जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने आश्रम तोडायला सुरवात केली.
दरम्यान आश्रमावरील कारवाई थांबविण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र देण्यात आले होते. परंतु कारवाई स्थगितीचा कोणताही आदेश नसल्याचे कारवाई करण्यात येत आहे. या विरोधात भाविक रस्त्यावर उतरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
राज्य सरकारने इमारतीमधील फ्लॅट आणि जागेची नोंदणी महाराष्ट्र जमीन महसूल अध....
अधिक वाचा