By
PRATIMA LANDGE | प्रकाशित:
एप्रिल 04, 2019 04:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
१एप्रिल २०१९पासून नवे आर्थिक वर्षे सुरू झाले आहे. प्रत्येक एप्रिलमध्ये बॅंकांना मोठी सुट्टी असते. पण यावेळेस सलग मोठी सुट्टी नसून वेगेवेगळ्या दिवशी सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे तुम्ही आतापासूनच बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी पाहून त्यानुसार आपली कामे करा. राज्यांनुसार वेगवेगळ्या दिवशी बॅंकांची सुट्टी राहणार आहे. एप्रिलमध्ये नेहमीप्रमाणे बैसाखी, राम नवमी, गुड फ्रायडे आणि महावीर जयंतीची बॅंकाना सुट्टी असणार आहे.दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बॅंका आधीच बंद असतात.महिन्याच्या पहिल्या शनिवारी म्हणजेच ६एप्रिलला गुढी पाडवा असल्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि गुजरातमध्ये बॅंका बंद असतील. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी नेहमीप्रमाणे बॅंका बंद राहतील. दुसरा शनिवार १३आणि चौथा शनिवार २७एप्रिलला येत आहे. म्हणजेच एप्रिलमध्ये २० एप्रिलला शनिवारी बॅंका खुल्ल्या राहतील.एप्रिल १३आणि १४एप्रिलला दुसऱ्या शनिवारी आणि रविवार असल्याने बॅंक बंद राहतील. या दोन्ही दिवशी आंबेडकर जयंती आणि बैसाखी देखील येतेय. या दोन्ही सुट्ट्या शनिवार आणि रविवारी असल्याने बॅंकांची सुट्टी कमी होईल.१७एप्रिल (बुधवारी) महावीर जयंती असल्या कारणाने अधिकतर राज्यांमध्ये बॅंकाना सुट्टी राहील. याच्या एक दिवसानंतर १९ एप्रिलला गुड फ्रायडे आहे. यामुळे १९एप्रिललाही बॅंक बंद राहतील.