By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 01:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
केंद्र सरकारने राष्ट्रीय बँकाच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात व बँक कर्मचार्यांच्या इतर मागण्यासाठी 4 बँक अधिकारी संघटनांनी येत्या 26 व 27 सप्टेंबर रोजी संप पुकारला होता. तथापि, बँक संघटनाच्या चर्चा झाल्यामुळे हा नियोजित संप मागे घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने 10 बँकाचे 4 बँकामध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 26 व 27 सप्टेंबर आणि पुढे चौथा शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने सलग चार दिवस बँका संपामुळे बंद राहणार होत्या. त्यामुळे ग्राहकांची मोठी पंचाईत होणार होती. मात्र आता बँका सुरू राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंड....
अधिक वाचा