By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 30, 2020 05:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली : बँक कर्मचार्यांच्या वेतन सुधारणेच्या मुद्द्यासह कामाची वेळ निश्चित करणे, कौटुंबिक पेन्शन इत्यादी मागण्यांसाठी शुक्रवार दि.३१ जानेवारी आणि शनिवार दि.१ फेब्रुवारी असे दोन दिवस बँक कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. तर २ फेब्रुवारीला रविवारी आहे. त्यामुळे उद्यापासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. या दरम्यान ऑनलाइन बँकिंग सेवा मात्र सुरळीत सुरू असतील, अशी माहिती 'ऑल इंडिया' बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन'चे अध्यक्ष सुनील कुमार यांनी दिली आहे.
बँक कर्मचार्यांचा संप आणि जोडून आलेला रविवार यामुळे बँकांच्या एटीएम मशीनमध्ये पैशांचा खडखडाट दिसू शकतो. या संपाविषयी भारतीय स्टेट बँकेसहीत (एसबीआय) इतरही सार्वजनिक बँकांनी आपल्या ग्राहकांना अलर्ट दिला आहे. मात्र खासगी बँकांवर या संपाचा परिणाम होणार नाही, असे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी नवीन रु....
अधिक वाचा