By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 14, 2019 11:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आंबोली घाटातून अवजड वाहतुकीस बंदीच्या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. आता बांधकाम खाते अंमलबजावणी करणार आहे. आंबोली घाटातून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्याने घाटातील पूर्वेच्या वस भागातील पूल धोकादायक बनले आहेत. तसेच घाटातील रस्त्याचे कामही सुरू करण्यात आल्याने आंबोली घाटातून अवजड वाहनांना पुढील आदेश येईपर्यंत प्रवेशबंदी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून तसा अध्यादेश गुरुवारी रात्री उशिरा सावंतवाडी बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात आलाय. याला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनीही दुजोरा दिला आहे.
आंबोली घाटातील पूल कमकुवत बनले आहेत. तसेच काही ठिकाणी पुलांना भेगा गेल्या आहेत. मध्यतंरी याबाबत आंबोलीतील ग्रामस्थांनी आवाज उठवला होता. तसेच आंबोली घाटातून अवजड वाहने बंद केली जावीत, अशी मागणीही लावून धरली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने तसा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने निर्णय घेऊन तो उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठवला होता. यामुळे आता आंबोली घाटातून पुढील आदेश येईपर्यंत अवजड वाहनांना बंदी असणार असणार आहे. तर, यात २० टनांच्या वरच्या वाहनांना ही बंदी असणार आहे. यातून खडी, वाळू तसेच चिरे वाहून नेणारे डंपर, एसटी बस, एसटीच्या शिवशाही बस यांना मुभा दिली असून मोठय़ा लॉरी तसेच अन्य वाहनांना परवानगी नाकारण्यात आली आहे. या अध्यादेशांची अंमलबजावणी गुरुवारी रात्रीपासूनच लागू करण्यात आली असून याबाबत बांधकाम विभागाने पोलिसांना ही माहिती दिलीय.
पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. ....
अधिक वाचा