ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंजाबमधील भटिंडा येथे कर्तव्यावर असताना बीडचे सुपुत्र महेश तिडके शहीद

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 12:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंजाबमधील भटिंडा येथे कर्तव्यावर असताना बीडचे सुपुत्र महेश तिडके शहीद

शहर : बीड

      नववर्षाचा पहिला दिवस महाराष्ट्रासाठी दुख:द ठरला आहे. बीड आणि साताऱ्यातील असे दोन जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत. पंजाबमधील भटिंडा येथे कर्तव्यावर असताना बीडमधील परळी तालुक्यातील लाडझरीचे जवान महेश यशवंत तिडके शहीद झाले. बुधवारी कर्तव्यावर असताना एका अपघातात महेश यांचा मृत्यू झाला.


       महेश यांच्या निधनाचे वृत्त समजताच परळी तालुक्यात शोककळा पसरली. गुरूवारी महेश यशवंत तिडके यांच्या पार्थिवावर लाडझरी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून शहीद महेश तिडके यांना श्रद्धांजली अर्पण करत आपले बलिदान सदैव स्मरणात राहिल, असे म्हटले आहे.

 

      तसेच नौशेरा येथे नवर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवाद्यांशी लढताना साताऱ्याचे जवन संदीप सावंत यांना वीरमरण आलं आहे. नौशेरा या ठिकाणी दहशतवाद्यांशी दोनहात करताना जवान संदीप सावंत शहीद झाले. ते सातारा जिल्ह्यातील मुंडे गावाचे रहिवासी होते. २५ वर्षीय संदीप सावंत यांच्यामागे त्यांची पत्नी सविता या आहेत.


     नववर्षाच्या पहाटे संदीप सावंत यांच्या गस्ती पथकाला नियंत्रण रेषेजवळ जंगलात हालचाली दिसल्या. सावंत यांच्यासह पथकातले सगळे सहकारी सज्ज झाले. दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे त्यांना दिसले. दाट धुके व कडाक्याच्या थंडीमुळे नेमकी संख्या समजू शकली नाही. मात्र संदीप नाईक यांनी आणि त्यांच्या पथकाने दहशतवाद्यांशी दोन हात करण्यास सुरुवात केली. मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संदीप यांना वीरमरण आलं.
 

मागे

नववर्षाच्या प्रथम दिवशी भारतात 67,385 बालकांचा जन्म
नववर्षाच्या प्रथम दिवशी भारतात 67,385 बालकांचा जन्म

        भारतात 2020 च्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी 67,385 बालकांनी ....

अधिक वाचा

पुढे  

49A द्वारे पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा? घ्यावयाची काळजी
49A द्वारे पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा? घ्यावयाची काळजी

          पॅन कार्डचा फॉर्म 49A काय आहे? पॅन कार्डसाठी जे कोणी अर्ज करत असत....

Read more