ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

9 ऑक्टोंबरपासून बेस्ट कर्मचार्‍यांचा बेमुदत संप

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2019 03:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

9 ऑक्टोंबरपासून बेस्ट कर्मचार्‍यांचा बेमुदत संप

शहर : मुंबई

बेस्टमधील कामगार संघटनांच्या वर्चस्वाच्या संघर्षात कामगार कर्मचार्‍यांसह प्रवाशांचीही परवड होण्याची चिन्हे आहे. बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार सेनेने अलीकडेच कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीचा सामंजस्य करार केला. मात्र हा करार शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट वर्कर्स युनियनला मान्य नाही. वेतन करारासह 7 मागण्यांसाठी येत्या 9 ऑक्टोंबरपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संप पुकारतील. असा इशारा युनियनने  बेस्ट प्रशासनाला नोटीसीव्दारे दिला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, बेस्ट कर्मचार्‍यांच्या वेतन वाढीचा करार रखडला होता. तेव्हा यासंबंधी बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासन यांच्यात सामंजस्य करार झाला . हा करार मान्य असल्याचे समतीपत्र ही कामगारांकडून घेण्यात येत आहे. ज्यांना करार मान्य आहे. त्यांचाच वेतनवाढ मिळेल , असेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र हा करार करताना बेस्ट वर्कर्स युंनियनसह अन्य कामगार संघटनांना विश्वासात घेतले गेले नाही. त्याचबरोबर हा सामंजस्य करार म्हणजे बेस्ट कामगार कर्मचार्‍यांची फसवणूक असल्याचा दावा बेस्ट वर्कर्स युंनियनने यापूर्वीच केला आहे.

वेतन वाढीच्या करारासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यासंदर्भात बेस्ट वर्कर्स युनियनने  कामगारांचे गुप्त मतदान घेऊन मत घेतले होते.

तरीही थेट संप न करता युनियनच्या नेत्यांनी उपोषण केले. दरम्यान बेस्ट कामगार सेना व बेस्ट प्रशासनाने सामंजस्य करार केला. या करारात अनेक त्रुटी असल्याचे बेस्ट वर्कर्स युनियनचे  म्हणणे आहे.

यापूर्वी बेस्ट वर्कर्स युनियनतर्फे 16 मे 2016, 6 ऑगस्ट 2019 रोजी सादर केलेल्या पर्यायी मागण्यांच्या पत्राच्या आधारे, युनियनसोबत वाटाघाटी करून अंतिम करार करण्याची प्रमुख मागणी आहे.  त्या जोडीला बेस्ट वर्कर्स युंनियनसोबत जोपर्यंत अंतिम करार होत नाही . तोपर्यंत कर्मचार्‍यांना 10 हजार रुपये अंतरिम वाढ देण्याची मागणी केली आहे. मुंबई पालिकेच्या बेस्ट उपक्रमासंबंधित 'क' अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या ठरावाची अमलबजावणी करण्याचाही मागणीत समावेश आहे.

तसेच बेस्ट कामगारांना पालिका कर्मचार्‍यांस 2016-17, 2017-18, 2018-19 मध्ये जाहीर झालेल्या दिवाळी बोनस इतकी रक्कम देण्यात यावी, आदि मागण्यासाठी बेस्ट वर्कर्स युनियनने बेमुदत संप पुकारला आहे.

मागे

देशांतर्गत कंपन्यांसाठी 22 टक्के आणि नव्या निर्मिती कंपन्यांसाठी 15 टक्के कॉर्पोरेट करदरात कपात
देशांतर्गत कंपन्यांसाठी 22 टक्के आणि नव्या निर्मिती कंपन्यांसाठी 15 टक्के कॉर्पोरेट करदरात कपात

प्राप्तिकर कायदा 1961 आणि वित्त (क्र. 2) कायदा 2019 मध्ये काही सुधारणा करण्यासाठी स....

अधिक वाचा