By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 11:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज सकाळच्या सुमारास गोरेगाव दिंडोशी येथे एका बेस्ट बसला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बेस्ट बसने गोकुळधाम परिसरात अचानक पेट घेतला. सुदैवाने आग लागली त्यावेळी बसमध्ये प्रवासी नव्हते, फक्त चालक आणि कंडक्टर हे दोघेच बसमध्ये होते. दोघांनी आग लागताच बसमधून उड्या मारल्या त्यामुळे जीवीतहानी टळली.
गोरेगाव पुर्वेच्या दिंडोशी येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजचाच्या सुमारास बेस्टच्या बसला आग लागली. आगीमुळे येथील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आग विझवली.
आपल्या मित्राबरोबर निर्जन स्थळावर बोलत बसलेल्या मुलीच्या मित्राला झाडावर....
अधिक वाचा