ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बेस्टच्या डबल डेकर बसचा अपघात 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 06:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बेस्टच्या डबल डेकर बसचा अपघात 

शहर : मुंबई

पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला ब्रिज सर्व्हिस रोडवर आज सकाळी बेस्टची डबल डेकर बस कमानीला धडकली. या अपघातात बसच्या टपाचा चक्काचूर झाला. सुदैवानं अपघातग्रस्त बसमध्ये प्रवासी नव्हते. त्यामुळं अनर्थ टळला. डबल डेकर मरोळ आगारातून कुर्ला आगाराकडे निघाली होती. वाकोला ब्रिजजवळ असलेल्या कमानीला ती धडकली. या अपघातात बसच्या टपाचं मोठं नुकसान झालं आहे. ’बस मरोळ आगारातून कुर्ला आगारामध्ये चालली होती. फेरी बस नसल्यानं प्रवासी नव्हते. चालक आणि वाहकाला कोणतीही दुखापत झाली नाही,’ अशी माहिती बेस्टच्या अधिकार्‍यानं दिली. या घटनेची चौकशी करून कारणांचा शोध घेण्यात येईल. चालक आनंद विभुते यांचीही चौकशी करण्यात येत आहे. मानवी चूक किंवा तांत्रिक समस्येमुळं हा अपघात झाला आहे का? हेही तपासून पाहिलं जाईल, असं अधिकार्‍यानं सांगितलं.

मागे

रिलायन्सला चार दिवसांत 70 हजार कोटींचा फटका
रिलायन्सला चार दिवसांत 70 हजार कोटींचा फटका

रिलायन्सला चार दिवसात 70 हजार कोटींचा फटका बसला आहे. शेअर बाजार आज तीन महिन्य....

अधिक वाचा

पुढे  

माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येला भाजप जबाबदार: अहमद पटेल
माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्येला भाजप जबाबदार: अहमद पटेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर भ्रष्टाचारी नंबर 1 असल्याचा आरोप ....

Read more