By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 03, 2020 10:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना संकटाच्या काळात अहोरात्र झटणाऱ्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार काल महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी 15 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे. मात्र, महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची घोषणा झाल्यानंतर आता बेस्टचे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर बेस्ट कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह अनुदान द्या, अशी मागणी आता करण्यात येत आहे.
कोरोना महामारीच्या काळात बेस्ट कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केलं. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांही सन्मान व्हायला हवा. मागील वर्षी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 5 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आलं होतं. पण यंदा महापालिका कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 15 हजार 500 रुपये देण्याची मागणी बेस्टच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेची कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
मुंबई महापालिका कामगारांना यंदा 15 हजार 500 रुपये बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे कामगारांच्या बोनसमध्ये गेल्यावर्षीपेक्षा 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असताना मुंबई महापालिकेने कामगारांसाठी ही भेट देऊन कामगारांची दिवाळी गोड केली आहे.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसह अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 7750, शिक्षण खात्यात मनपा प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 4700 आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना 2350 रुपये बोनस देण्यात येणार आहे. शिवाय सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 4400 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा किशोरी पेडणेकर यांनी केली.
वैद्यकीय शाखेतील प्रवेशात आरक्षणापासून वंचित राहणार्या मराठा विद्यार्....
अधिक वाचा