By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 12:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेले दोन दिवस बेस्ट बसचे कामगार संपावर जाणार असल्याची चर्चा रंगली होती. तथापि बेस्ट कामगारांच्या मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने काल मंगळवारी रात्रीपासूनच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. प्रलंबित वेतन करारासह विविध मागण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे. मात्र सरकारने न्याय्य मागाण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संप पुकारावा लागेल, असा इशाराही समितीने दिला आहे. कृती समितीकडून शशांक राव यांच्यासह अन्य नेत्यांनी उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान काल दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बेस्ट कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यात कामगांराच्या वेतनवाढीसह अन्य मागण्याबाबत ठाकरे यांनी सकारात्मक दृष्टीकोण मांडल्याचे शिष्टमंडळातील पदाधिकार्यांनी सांगितले. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेन्द्र कुमार बागडे, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, उदय अंबोणकर, आदि सहभागी होते. त्यावेळी बेस्ट कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागल्याचा दावा बेस्ट कामगार सेनेने केला आहे.
त्यामुळे शशांक राव यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची हवाच निघून गेल्याचे म्हटले जात आहे.
पालिका कर्मचारीही संपाच्या तयारीत
बेस्ट कामगार आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत असतानाच आता महापालिका कर्मचारीही आपल्या प्रलंबित मागण्यासाठी संप पुकारण्याच्या तयारीत असल्याचे कळते. या संदर्भात मुंबई महापलिका कामगार संघटनाच्या नेत्यांची काल मंगळवारी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासोबत बैठक झाली. यात कोणताही तोडगा निघाला नाही, त्यामुळे संघटना आज आझाद मैदानात शक्ति प्रदर्शन करणार आहेत. आंदोलनात कोणत्याही क्षणी संप पुकारला जाईल, अशी माहिती समन्वय समितीचे निमंत्रक सुखदेव कशिद यांनी दिली.
कोल्हापुरात महापुरामुळे गावे उध्वस्त झाली. 15 दिवसांनंतर पुराचे पाणी ओसरल्....
अधिक वाचा