By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 11:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आजपासून बेस्ट चा प्रवास स्वस्त झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना किमान प्रवासासाठी फक्त 5 रुपये आणि त्या जोडीला भविष्यात दाखल होणार्या एसी बसच्या किमान प्रवासासाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या आर्थिक निधीच्या अनुषंगाने बेस्ट तिकीट दर कमी करण्याचा मार्ग प्रत्यक्षात आला आहे.
बेस्टची प्रवासी संख्या सध्या प्रतीदिन 25 ते 40 लाखापर्यंत कमी झाली आहे. ही प्रवासी संख्या 50 लाखापर्यंत नेण्याचे उदिष्ट ठेवत तिकीट दरकपातीचा महत्वचा निर्णय बेस्ट ने घेतला . त्याला सोमवारी राज्य सरकारणेदेखील संमती दिली आणि बेस्टने त्या अमलबजावणीचा निर्णय लागू केला, साधी बस 5 की.मी. साठी 5 रुपये ,10 किमी साठी 10 रुपये 15 किमी साठी 15 रुपये तर 15 च्या पुढे 20 रुपये आणि एसी बस साधी 5 किमी ला 6 रुपये, 10 किमी ला 13, 15 किमी ला 19 तर 15 किमी च्या वर 25 रुपये मोजावे लागणार आहे.
तथापि वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. तो जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत या दरकपातीचा लाभ बेस्टला कितपत होईल , या विषयी शंका असल्याचे दिसते.
जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विन....
अधिक वाचा