By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 29, 2019 11:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
बेस्ट कामगारांच्या मागण्यासंदर्भात शिवसेनेने केलेल्या वाटाघाटी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीला मान्य नाहीत. शिवाय कृती समितीचे नेते शशांक राव आणि बेस्ट चे महाव्यवस्थापक सुरेन्द्र बागडे यांच्यात झालेली चर्चा फिसकटल्याने कर्मचार्याचे उपोषण सुरूच राहणार असल्याचे राव यांनी रात्री उशिरा जाहीर केले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात बेस्ट कर्मचार्यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बेस्ट कामगारांना 7 व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर ऑक्टोबरमध्ये पगार देण्याचा आणि महापालिका कर्माचार्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना सचिव अॅड. अनिल परब यांनी दिली. तथापि या वाटाघाटी बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने फेटाळल्या.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील कायम विना अनूदा....
अधिक वाचा