By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 02:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
'बीआयआर अॅक्ट' मधून बेस्टला वगळल्यामुळे धास्तावलेल्या बेस्ट कर्मचार्यांनी वेतन व सेवाशर्ती बाबत तातडीने वाटाघाटी सुरू करण्यात या मागण्यासाठी येत्या 7 ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात काल वडाळा आगारात 'बेस्ट वर्कर्स यूनियन' व कर्मचार्यांमध्ये अंतिम बैठक पार पडली. या बैठकीत मागण्या मान्य होईपर्यत संप मागे घेऊ नये, अशी भूमिका कर्मचार्यांनी घेतली आहे.
बेस्ट प्रशासन व कर्मचारी संघटनांमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार एप्रिल 2017 पासून भरती झालेल्या कर्मचार्यांना उर्वरित 10 वेतन वाढ मंजूर करून त्याची तातडीने अमलबजावणी करण्यात आली. वेतनवाढ संदर्भात आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बेस्ट वर्कर्स यूनियन ने प्रशासनाला चार वेळा पत्रही दिले. मात्र प्रतिसाद न दिल्याने संघटनांनी 6 ऑगस्टच्या मध्यरात्री पासून संपाचा निर्णय घेतला आहे.
त्याशिवाय बेस्टला महाराष्ट्र औद्योगिक संबंध कायद्यातून (बिआयआर अॅक्ट) वगळल्याच्या अधिसूचनेविरोधात दोन-तीन दिवसात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याचे यूनियन नेते शशांक राव यांनी सांगितले.
कोणत्याही मंदिराबाहेर गायी गुरे बांधून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आपल्याला....
अधिक वाचा