By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2020 10:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
एक धक्कादायक बातमी लस (Corona vaccine) संदर्भातील. कोरोनाचा (Coronavirus) धोका जगभरात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधन सुरु आहे. कोरोनावर लस (Corona vaccine) शोधण्यात आली आहे. काही ठिकाणी कोरोना लसची चाचणी यशस्वी झाली आहे. काही देशांत लस टोचून घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे कोरोना 'लस'साठी (Coronavirus vaccine) जगाचे लक्ष लागले आहे. मात्र याच 'लस'वरून तुमच्या आमच्या आयुष्याला धोका निर्माण होईल, असे कृत्य सायबर क्राईमच्या (Cybercrime ) माध्यमातून घडत आहे, तेव्हा सावधान राहा. धक्कादायक अशी ही बातमी हाती आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सायबर क्राईम आणि इंटरपोलने (Maharashtra Cyber Crime and Interpol) सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नकली लस बाजारात येण्याची भीती, व्यक्त होत आहे.
लस बनवणाऱ्या कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होण्याची शक्यता आहे. नॉर्थ कोरिया आणि चीनचे सायबर क्रिमिनल ग्रुप सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे. 'लस'बाबत माहिती चोरून इतर कंपन्यांना विकण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सायबर क्राईम आणि इंटरपोलने (Maharashtra Cyber Crime and Interpol)सावधानतेचा इशारा दिला आहे. 'डार्क नेट'वर लस विकणाऱ्या अनेक बोगस वेबसाईटचा सुळसुळाट दिसून येत आहे.
'कोरोना लस'ची माहिती चोरण्याचा खटाटोप सुरु आहे. एखाद्या बनावट वेबसाइट्सद्वारे गुन्हेगार जनतेला लक्ष्य करतील आणि लोकांचे आरोग्य धोक्यात आणतील, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचा आवाहन सायबर क्राईम कडून करण्यात येत आहे. नॉर्थ कोरियाचा आणि चीनचा सायबर ग्रुप यात सहभागी असल्याचे सायबर क्राईम विभागाचे म्हणणे आहे. 'डार्क नेट'च्या माध्यमातून हा सगळा व्यवहार सुरू होईल, याचे पैसे सुद्धा डार्क नेटच्याच माध्यमातून बिट कॉइन स्वरूपात घेतले जाईल आणि तुमची फसवणूक होईल असं सायबर क्राईमकडून सांगण्यात येत आहे.
इतकेच नाही तर तुम्हाला लस मिळेल, अशा जाहिराती सुदधा 'डार्क नेट'वर सुरू झाल्या असल्याचे सायबर क्राईम विभागाने स्पष्ट केले आहे. 'लस'बाबत माहिती चोरण्यासाठी या विविध कंपन्यांच्या सर्व्हरवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु झाले आहेत. ज्या कंपन्यांना लस देण्याची परवानगी सरकारकडे मागितली त्यांच्यावर तर सायबर गुन्हेगार तुटून पडले असल्याची धक्कादायक माहिती सायबर क्राईम विभागाने दिली आहे.
बाजारात येणाऱ्या लसबाबतची माहिती आणि त्या कंपन्यांची माहिती चोरून ही माहिती दुसऱ्या औषध कंपनीला विकण्यासाठी ही चोरी सुरु आहे. यातून नकली लस बाजारात येण्याची भीती सायबर क्राईम विभागाला आहे. महाराष्ट्र सायबर क्राईम सोबत इंटरपोलने सुद्धा याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.
केंद्र सरकारने कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरची स्वायत्ता काढून घेतल्याने जम्म....
अधिक वाचा