ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईकरांनो जर रस्त्यावर कचरा टाकत असाल तर सावधान

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 11:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईकरांनो जर रस्त्यावर कचरा टाकत असाल तर सावधान

शहर : मुंबई

          मुंबई - शहरात पोलीस विभागाकडून लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची नजर नेहमीच मुंबईवर असते. पण आता यात अजून भर पडणार आहे. मुंबईत अतिरिक्त 5,500 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. यापैकी 500 सीसीटीव्ही हे मुंबई महापालिका बसवणार आहे. त्यामुळे मुंबईकर जर तुम्ही रस्त्यावर कचरा, डेब्रीज टाकत असाल तर सावधान, कारण तुमच्यावर आता महापालिकेच्या सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. 


          मुंबईच्या प्रत्येक चौकात, सार्वजनिक ठिकाणी, महत्त्वाच्या ठिकाणी लावलेले कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईच्या पोलिसांना मोठी मदत करत आहेत. आता मुंबई महापालिकासुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे. इस्त्रायल आणि इतर देशांच्या धर्तीवर नव्यानं लावल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये व्हिडीओ अॅनॅलिटिक्स टूलचा वापर केला जाणार आहे. 


          या नव्या तंत्रामुळे, झाड कोसळणे, इमारत पडणे, पूरस्थिती निर्माण होणे, अवैधरित्या कचरा टाकणे, डेब्रीज टाकणे, चेंगराचेंगरीची परिस्थिती या बाबींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. मुंबई पोलिसांकडून यापूर्वीच 5,000 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. आता मुंबई पोलिसांकडून अतिरीक्त 5,000 कॅमेरे लावले जातील. मुंबई सुरक्षित करण्यासोबतच मुंबई दूर्घटनामुक्त, कचरामुक्त करण्यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत, अशी माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.
 

मागे

ठाकरे सरकार अॅक्सिस बँकेतील 'ती' खाती वळवणार?
ठाकरे सरकार अॅक्सिस बँकेतील 'ती' खाती वळवणार?

              मुंबई - महाराष्ट्रातील सत्तापालटाचा फटका ‘अॅक्सिस बँ....

अधिक वाचा

पुढे  

जम्बो ब्लॉकमुळे प्रवासी हवालदिल
जम्बो ब्लॉकमुळे प्रवासी हवालदिल

         डोंबिवली - नाताळ सणाच्या दिवशी अनेक कार्यालयांना असणारी सुट्ट....

Read more