By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 06:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील भडवळे गावात डोंगराला पडलेला 12 ते 15 फूट खोल आणि15 फूट रुंद भेगा पडल्यामुळे धोक्यात आले आहे. या गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेत रात्र रात्र जागून काढत आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सुमारे एक हजार लोकवस्ती असलेल्या गावात डोंगररांगा प्रचंड भेगा पडून भली मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे येथीलशिंदेवाडी, देऊळवाडी आणि बौद्धवाडीतील कुटुंबांना तात्काळ स्थलांतरित होण्याचा आदेश देण्यात आले आहेत. मात्र स्थलांतरित कुठे व्हायचे हा प्रश्न काही लोकांच्या मनात कायम आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण असून भेगा कशामुळे पडतात याचा शोध घेण्यासाठी भूगर्भ संशोधन होणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे. यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याने भडवळे गावचे 'माळिण' होण्याची सरकार वाट पाहतेय का ? असा सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पाठवलेले चंद्रयान-2 चंद्राच्या दिशेने मार्ग....
अधिक वाचा