By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2020 11:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
कोरोनाला थोपवण्यासाठी हैदराबाद स्थित भारत बायोटेक (Bharat biotech) कंपनीकडून कोव्हॉक्सीन नावाची लस विकसित केली जात आहे. ही लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होणार असून ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने तशी परवानगी दिली आहे. 2 ऑक्टोबरला भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी DCGI कडे परवानगी मागितली होती. ही परवानगी आता मिळाली असून स्वदेशी लस लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोव्हॅक्सीन लस निर्माण करण्यासाठी भारत बायोटेक या कंपनीला ICMR चेही सहकार्य काहे. या कंपनीने क्लिनिकल ट्रायल संदर्भात नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 18 तसेच त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या स्वयंसेवकांवर करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात एकूण 28,500 स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे. देशात एकूण दहा ठिकाणी कोव्हॅक्सीन लसीची चाचणी होणार आहे.
मागील महिन्याच्या एका अहवालात भारत बायोटेकने आपली लस ही अत्यंत प्रभावी असून कोरोना व्हायरस विरोधात लढण्यास सक्षम असल्याचा दावा केला होता. प्राण्यांवर चाचणी केल्यानंतर त्यांच्यात चांगली रोगप्रतिकार शक्ती निर्माण झाल्याचा दावा कंपनीने केला होता. देशात भारत बायोटेक तसेच झायडस कॅडिला या कंपनीकडूनही लस विकसित करण्यात येत आहे. या कंपनीची लस चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यातआहे. पुणेस्थित सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाकडूनही लसीवर काम सुरु आहे.
ब्राझिमध्ये चाचणीदरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू
दरम्यान, कोरोना लसीसाठी जगभारात वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे. ब्राझीलमध्ये (Brazil) कोरोना लसीची चाचणी सुरु असताना बुधवारी (21 ऑक्टोबर) एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने बुधवारी तशी माहिती दिली.
अॅस्ट्रोजनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतर्फे या लसीची चाचणी बऱ्याच स्वयंसेवकांवर सुरु आहे. या चाचणीदरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. ब्राझील सरकारने गोपनीयतेचे कारण देत मृत्यूबद्दल अधिकची माहिती देण्यास नकार दिला आहे. स्वयंसेवकाच्या मृत्यूनंतर अॅस्ट्रोजनेका कंपनीला मोठा फटका बसला होता. अॅस्ट्रोजनेका कंपनीचे शेअर्स जवळपास 1.7 टक्क्यांनी पडले होते.
पुण्यातून मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील आटोमोबाईल्सचे व्यव....
अधिक वाचा