By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 07:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारत बायोटेकच्या बहुप्रतीक्षित कोवॅक्सीन या कोरोना वरील लसीची दुसऱ्या टप्याची चाचणी सुरु झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात देशभरात 12 ऐवजी 8 केंद्रांवर ही चाचणी घेण्यात येत असून नागपूर त्यापैकी एक आहे. दुसऱ्या टप्प्यात नागपुरात 50 जणांना ही लस लावण्यात आली असून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या पहिल्या टप्प्यात नागपुरात 55 जणांवर लसीची चाचणी करण्यात आली होती. दोन वेळा लस लावल्या गेल्यानंतर निगराणीच्या कालावधीत त्या सर्वांची तब्येत ठणठणीत असल्याने आता दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे.
नागपुरात ज्या गिल्लूरकर मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटलमध्ये कोवॅक्सीनची चाचणी सुरु आहे, त्याचे संचालक डॉ चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यात काही बदल करण्यात आले असून सर्वात महत्वाचा बदल चाचणीसाठी कमी आणि जास्त वयाचे स्वयंसेवक ही निवडण्यात आले आहे. पहिल्या टप्प्याच्या चाचणीत 18 ते 55 वयोगटातील स्वयंसेवकांना लस लावली गेली होती. त्यांच्या वरील परिणाम उत्साहवर्धक असल्याने आता 12 ते 65 वयोगटातील स्वयंसेवकांना चाचणीसाठी निवडले गेले आहे. त्यामुळे किशोरवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकनांना लस दिल्यास त्याचे परिणाम काय होणार हे या टप्प्यात तपासले जाणार आहे.
पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात होणारा आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे लसीच्या दोन डोसेज मधला अंतर वाढवला गेला आहे. पहिल्या टप्प्यात दोन डोसेज मध्ये 14 दिवसांचे अंतर ठेवण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात दोन डोसेजमध्ये 28 दिवसांचे अंतर ठेवले जाणार आहे. ( प्रत्येक टप्प्यात प्रत्येक स्वयंसेवकाला दोन वेळेला लसीचे डोज दिले जातात )
दरम्यान, पहिल्या टप्प्यात देशभर ज्या 375 स्वयंसेवकांना ही लस लावण्यात आली होती. त्या सर्वांची प्रकृती चांगली असून त्यापैकी एकाही ही स्वयंसेवकाला कुठलाही त्रास झालेला नाही. त्यामुळे कोवॅक्सीन लसीच्या सुरक्षिततेबद्दल आता कोणतीही साशंकता राहिली नसल्याचे तज्ज्ञांना वाटतंय. पहिल्या टप्प्यातील स्वयंसेवकांना लसीचे दोन डोज लावल्यानंतर त्यांच्या शरीरात कोरोना विषाणू संदर्भात अँटीबॉडीज तयार झाले की नाही याची तपासणीही भारत बायोटेकने केली आहे. मात्र, त्याचा डेटा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआय आणि सरकार सोबत शेअर केला जात असून त्यांच्या माध्यमातूनच लवकरच संपूर्ण देशाचा डेटा जाहीर केला जाईल अशी अपेक्षा आहे.दरम्यान, लसीचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा टप्पा ही सुरु झाला आहे. त्यामुळे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआय लवकरच लसीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचण्यांसाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भारताचा कोरोना विरोधातला लढा निर्णायक टप्प्यात पोहोचेल.
मुंबई कोव्हिड रुग्णालयांसाठी सरकारने सक्तीने लादलेल्या आणि मुळीच न परवडण....
अधिक वाचा