ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारत बायोटेक'ची कोरोना प्रतिबंधक लस 2021च्या मार्चनंतर येण्याची शक्यता, काय असेल किंमत?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 02, 2020 10:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारत बायोटेक'ची कोरोना प्रतिबंधक लस 2021च्या मार्चनंतर येण्याची शक्यता, काय असेल किंमत?

शहर : देश

भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health  ministry) दिलेल्या माहितीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या 80 लाख पार गेली आहे. तर दुसरीकडे भारतासह जगभरात कोरोनावर लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. भारत बायोटेक (Bharat biotech) कंपनीची कोरोना प्रतिबंधक लसही (Corona Vaccine) पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी औषधे नियामक मंडळाकडून आवश्यक परवानग्यांची गरज आहे.(

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीच्या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. देशातील वेगवेगळ्या शहरात ही चाचणी सुरु असल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक साई प्रसाद यांनी दिली आहे. त्यासाठी कंपनीने जवळपास 350 – 400 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यासाठी काही नवीन प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. सरकारी आणि खासगी बाजारपेठांनाही कोरोनाची लस पुरवण्याचं भारत बायोटेकचा विचार आहे. भारत बायोटेकने कोरोना लसीची किंमत अद्याप ठरवलेली नाही. कारण, कंपनी सध्या फक्त लसीच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं.

भारतातील कोरोना रुग्णांची स्थिती

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 80 लाख 88 हजार 851 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 5 लाथ 94 हजार 386 अॅक्टिव रुग्ण आहेत. तर 73 लाख 73 हजार 375 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 17 हजार 306 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जगभरातील कोरोनाची आकडेवारी

तर जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4 कोटी 54 लाख 75 हजार 639 वर जाऊन पोहोचला आहे. तर जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 11 लाख 87 हजार 014 जणांचा मृत्यू झाला आहे.

फ्रान्स-जर्मनीपाठोपाठ इंग्लंडमध्येही पुन्हा लॉकडाऊन

कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे युरोपातील (Europe) देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जर्मनीमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 40 वाढ झाल्यामुळे 2 नोव्हेंबरपासून लाॉकडाऊनची (lockdown) कडकपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये शुक्रवारपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. स्पेनमध्येही यापूर्वीच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या देशांपाठोपाठ आता इंग्लंडमध्येदेखील पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी शनिवारी कडक लॉकडाऊनची घोषणा करत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

मागे

मुंबईत 244 ठिकाणी बीएमसीकडून कोरोनाची मोफत चाचणी, कुठे-कुठे सुविधा?
मुंबईत 244 ठिकाणी बीएमसीकडून कोरोनाची मोफत चाचणी, कुठे-कुठे सुविधा?

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संभाव्य कोव्हिड संसर्गावर अधिकाधिक प्रभा....

अधिक वाचा

पुढे  

ओबीसी आणि भटक्या समाजाच्या 10 हजार मुलांना NEET आणि JEE प्रशिक्षण : विजय वडेट्टीवार
ओबीसी आणि भटक्या समाजाच्या 10 हजार मुलांना NEET आणि JEE प्रशिक्षण : विजय वडेट्टीवार

ओबीसी आणि भटक्या समाजाच्या 10 हजार मुलांना नीट आणि जेईई परीक्षेचे प्रशिक्षण ....

Read more