ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरेगाव-भीमा येथे शौर्य दिनानिमित्ताने विजयस्तंभ अभिवादन

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरेगाव-भीमा येथे शौर्य दिनानिमित्ताने विजयस्तंभ अभिवादन

शहर : पुणे

          पुणे - कोरेगाव-भीमा इथे आज १ जानेवारी शौर्य दिनानिमित्ताने विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी  अनुयायांचा जनसागर लोटला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 


       राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा इथे सकाळीच दाखल होत विजयस्तंभाला अभिवादन केलं. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहनही त्यांनी केलं. कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभास प्रकाश आंबेडकर यांनीदेखील अभिवादन करत मानवंदना दिली. अनेक मोठे नेतेही आज अभिवादनासाठी याठिकाणी जाणार आहेत.


           भीमा कोरेगाव इथे 2018 मध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकूण 10 हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. 250 व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दीडशे एकरवरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 2018 च्या दंगलीत सहभागी लोकांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

मागे

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी देशाचे 28 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी देशाचे 28 वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

महाराष्ट्रासाठी अभिमानाची असा क्षण असून देशाच्या लष्करप्रमुखपदी मनोज नरव....

अधिक वाचा

पुढे  

विठ्ठल मंदिरात मोबाइल बंदीचा निर्णय
विठ्ठल मंदिरात मोबाइल बंदीचा निर्णय

           सोलापूर - नवीन वर्षाची सुरवात परमात्मा पांडुरंगाच्या पदस्प....

Read more