By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2019 11:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : baramati
पावसाळयापासून भिंत, इमारत , संरक्षण भिंती कोसळण्याचे चालू असलेले सत्र अद्यापही थांबलेले दिसत नाही. भिवंडीतील शांतिंनगर परिसरातील एक चार माळ्याची अनधिकृत इमारत कोसळून काल रात्री 2 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले.
ही इमारत अनधिकृत असल्याने पालिकेने रिकामी केली होती. मात्र काही जण बेकायदेशीरपणे ह्या इमारतीत राहत असल्याचे पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले. तत्पूर्वी रात्रीपासूनच बचाव कार्य सुरू झाले असून अजून काही लोक ढीगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ च्या पथकानी धाव घेऊन ढिगारे हटविण्याचे मदत कार्य रात्रीच सुरू केले आहे. जखमीना इंदिरा गांधी स्मृति रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
भिवंडी निजामपुर महापालिका आयुक्त अशोक रणखांब यांनी ह्या प्रकरणाची अधिकची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे संगितले आहे. ही इमारत 8 वर्षापूर्वी बांधली गेली होती. पालिकेने इमारत रिकामी केली होती. मात्र पालिकेने ह्या इमारतीला अनधिकृत घोषित केल्यावरही नागरिक ह्या इमारतीत राहायला का गेले ? हा प्रश्न उपस्थित होतो.
Ashok Rankhamb: We vacated the entire building but some people entered the building without permission. It was then the building collapsed. 4 people were rescued, of them one died. It's an 8-year-old building & was built illegally. Investigation will be done. https://t.co/UhX0OSVTxX
— ANI (@ANI) August 24, 2019
नागरिक कधी सुधारणार ?
काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने मोडकळीस आलेल्या इमारती आणि अनधिकृत इमारती बद्दल एक निकाल दिला होता. त्यात मुंबई महानगर पालिकेला अशा धोकादायक इमारती ताबडतोब पाडा , मोकळ्या करा असे सांगितले होते. त्यानंतरही काही इमारतीमध्ये जबरदस्तीने माणस राहत आहेत. ही मोठी चिंताजनक परिस्थिती असल्याचे दिसत आहे. जिवावर उदार होवून नागरिक अश्या इमारतींमध्ये का राहत आहेत. अश्या ठिकाणी राहणे ही अपरिहार्य गोष्ट आहे काय ?
लोकांच्या मनातील प्रश्न
जर पालिकेने ही इमारत रिकामी केली असेल तर राहायला गेलेली माणसांची पालिकेला माहिती नव्हती काय ? पालिकेतल्या ताब्यात गेल्यावर रीतसर नोटिस देवून रिकामी केली इमारतीत कोणत्या अपरिहार्य कारणामुळे माणस राहत होती ? त्याबद्दल पालिकेला काही माहीत होत की नाही ? त्यांच्यावर वेळीच कारवाई का गेली नाही ? 8 वर्षात इमारत कोसळत असतील तर सध्या असलेल्या इतर इमारतींच्या बांधकांमाचा दर्जा काय असेल ? सरकार नागरिकांना सुरक्षित वस्तिस्थान देण्यास असमर्थ आहे काय ? धोकादायक अथवा बेकायदा इमारती असतील तर त्या इमारतीची पाडकाम वेळेत का केली जात नाहीत? अनेक इमारतींच्या बाबतीत दंड भरून अधिकृत केल्याच्याही बाबी झाल्या आहेत ह्या अशा इमारती दंड भरून अधिकृत होत असतील तर नागरिकांचा जीव सरकार धोक्यात तर आणत नाही ना ? सरकार योग्य ती कारवाई करत असेल तर नागरिक सहकार्य का करत नाहीत ? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत आहेत.
आज श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होत आहे. उद्या दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. त....
अधिक वाचा