By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 20, 2020 06:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महिलांसाठी लोकल सुरु करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेतला. नवरात्री उत्सवाच्या सुरुवातीपासून महिलांसाठी लोकल प्रवास खुला करण्याची घोषणा केली. मात्र, रेल्वेकडून खोडा घातण्यात आला. त्यावरुन राजकारण सुरु करण्यात आले. अखेर उद्यापासून महिलांसाठी मुंबई लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना याबाबत घोषणा केली आहे. उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्यादरम्यान आणि सायंकाळी सात नंतर मुंबई उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून रेल्वेला पत्र पाठविण्यात आले होते. तसे परिपत्रक काढले होते. मात्र, रेल्वेकडून खोडा घालण्यात आला होता. भाजपने या वादात उडी घेत राज्य सरकारवरच टीका केली. दरम्यान, आम्ही सकारात्मक असल्याचे मध्य रेल्वे सांगत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. रेल्वेकडून कुठलाही विलंब नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तर दुसरीकडे राज्य सरकार म्हणतेय रेल्वेकडूनच ग्रीन सिग्नल मिळत नाही. महिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्याबाबत रेल्वेला पुन्हा पत्र पाठवले आहे. रेल्वे तसेच राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेची आठवणही या पत्राद्वारे मुख्य सचिवांनी करून दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं रेल्वे मंत्रालय चालढकल करत असल्याचा आरोप केला.
या आरोप-प्रत्यारोपानंतर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी महिलांसाठी रेल्वे प्रवासाला हिरवा कंदील दाखवला. ते म्हणाले, मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, वाजण्यादरम्यान आणि सायंकाळी सात नंतर मुंबई उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती. त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत.
I am happy to announce that Railways will allow women to travel on suburban trains from 21 Oct between 11 am to 3 pm & after 7 pm. We were always ready and with receipt of letter from Maharashtra Govt today, we've allowed this travel: Railway Minister Piyush Goyal (File photo) pic.twitter.com/kl6liQFqdG
— ANI (@ANI) October 20, 2020
महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यावरून घोळ सुरू असताना याबाबत संतापाची भावना उमटत होती. राज्य आणि केंद्रानं जे काय ठरवायचं ते लवकर ठरवा, पण निर्णय घ्या, अशी प्रतिक्रिया महिलांमधून उमटत होती.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील दोन बहिणींना गेल्या वर्षी दिलेला ....
अधिक वाचा