ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवे उद्या दुपारी दोन तास बंद

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 04:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवे उद्या दुपारी दोन तास बंद

शहर : पुणे

मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक गुरुवारी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे़. त्यादरम्यान सर्व प्रकारची अवजड व मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील किमी़ 85/100 या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे़. हलकी चारचाकी व इतर वाहने किवळे पुलावरुन जुना मुंबई -पुणे महामार्गाने मुंबईकडे वळविण्यात येणार आहे़.  मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर किमी 55/600 आणि 88 वर (मुंबई वाहिनी) वर हे काम करण्यात येणार आहे़. वाहनचालकांना द्रुतगती महामार्गावरील वाहतूकीची सध्यस्थिती समजावी यासाठी हे फलक लावण्यात येत आहेत़. वाहनचालकांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे, अशी आवाहन पोलीस अधीक्षक रुपाली अंबुरे यांनी केले आहे़.

मागे

सातारा - पुणे महामार्गावरील अपघातात जवानाचा मृत्यू
सातारा - पुणे महामार्गावरील अपघातात जवानाचा मृत्यू

सातारा - पुणे महामार्गावर सुरुर फाट्यानजीक रविवारी सायंकाळी चारच्या सुमार....

अधिक वाचा

पुढे  

’आमच्या बोलण्यानं भूकंप येत असेल तर त्याला सामोरं जावं’, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
’आमच्या बोलण्यानं भूकंप येत असेल तर त्याला सामोरं जावं’, उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

नारायण राणेंच्या आत्मचरित्रामुळे जर का राजकीय भूकंप येत असेल तर त्याचा स....

Read more