ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्ट सहसंस्थापक पदाचा राजीनामा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 14, 2020 11:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्ट सहसंस्थापक पदाचा राजीनामा

शहर : विदेश

बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या सहसंस्थापक पदाचा राजीनामा दिला. यापुढे जनतेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, ग्लोबल एज्युकेशनसाठी आणि जलवायू परिवर्तनासाठी काम करायचे असल्याचे बिल गेट्स यांनी सांगितलं. ते मायक्रोसॉफ्ट कंपनीतून जरी बाहेर पडले असले तरीही कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांचे तांत्रिक सल्लागार म्हणून ते यापुढेही काम करणार आहेत.

बिल गेट्स आता कंपनीसाठी काम करणार नसल्याने ते सामाज कार्यात सहभाग नोंदविणार आहेत. तसे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच ते सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले आहेत. परंतु ते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्यासोबत तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.

बिल गेट्स यांनी स्पष्ट केले की, मी सर्वाधिक वेळ शिक्षण, आरोग्य आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी देणार आहे, त्यामुळे मी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा देत आहे. ही माहिती मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आली. १९७५ मध्ये पॉल अलेन यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. २००० पर्यंत त्यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली होती. दरम्यान, बिल गेट्स यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांची संख्या १२ झाली आहे.

मागे

कोरोना बचावासाठी एअर इंडियाचे मोठे पाऊल
कोरोना बचावासाठी एअर इंडियाचे मोठे पाऊल

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर एअर इंडियाने (Air India ) कुवेत आणि इटलीला जाणारी व....

अधिक वाचा

पुढे  

...म्हणून कोरोनाग्रस्तांना भोगावा लागणार २१ वर्ष तुरूंगवास
...म्हणून कोरोनाग्रस्तांना भोगावा लागणार २१ वर्ष तुरूंगवास

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोनाने शिरकाव केला....

Read more