ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक हजेरी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक हजेरी

शहर : देश

        औरंगाबाद - आता विद्यार्थ्यांचं मस्टर इतिहास जमा होणार आहे. 'हजर गुरुजी', 'यस सर'चा आवाज देखील बंद होणार. कारण आता शाळेत बायोमेट्रिक हजेरी लावली जाणार आहे. आतापर्यंत शाळेत हजेरी घेण्याची जुनी पद्धत होती. मुलं हजर गुरुजी किंवा यस सर म्हणायची... मात्र आता ही पद्धत आता बंद होणार आहे. कारण या पुढं हजेरी नोंदवतांना विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगठ्याचा वापर करावा लागणार आहे.  


        केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार आता विद्यार्थ्यांची  हजेरी बायोमेट्रीक पद्धतीनं घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत..  मुख्य बाब म्हणजे शैक्षणिक संस्थांना बायोमेट्रिक हजेरीसाठीच्या यंत्रणेचा खर्च करावा लागणार आहे. या पद्धतीनं हजेरी घेतली तर वेळ जाणार हे निश्चित, एका शाळेत हजारांवर मुलं असतात, ही मुलं रांगेत जरी लागली तरी सर्व विद्यार्थ्यांची फक्त हजेरीच घ्यायला 4 तास लागतील, शाळा नक्की किती बायोमेट्रीक मशीन बसवणार यावरही मर्यादा असेलच, बोगस विद्यार्थी हजेरी लावणा-या शाळांसाठी नक्कीच हा धोका असेल, मात्र ज्या शाळेत विद्यार्थीसंख्या जास्त असेल, त्यांना आता फक्त हजेरीसाठी किमान तास दोन तास राखून ठेवावे लागतील हे निश्चित.


        बायोमेट्रिक हजेरीमुळे शाळांची डोकेदुखी वाढणार आहे. एका शाळेतली बायोमेट्रिक हजेरी पूर्ण करण्यासाठी चार तासांचा वेळ जाईल असा दावा संस्थाचालकांचा आहे. संस्थाचालक आणि शिक्षक आमदारांनी या निर्णयाला विरोध केला आहे. बायोमेट्रिक हजेरीमुळे बोगस पटसंख्या दाखवता येणार नाही. यामुळं सरकारच्या अनुदानाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. पण या नव्या पद्धतीमुळे हजेरीची पूर्वापार चालत आलेली प्रथा कायमची इतिहासजमा होणार आहे.
 

मागे

जम्बो ब्लॉकमुळे प्रवासी हवालदिल
जम्बो ब्लॉकमुळे प्रवासी हवालदिल

         डोंबिवली - नाताळ सणाच्या दिवशी अनेक कार्यालयांना असणारी सुट्ट....

अधिक वाचा

पुढे  

११ हजार तरुणांना ५५० कोटी रुपयांचे कर्जवाटप
११ हजार तरुणांना ५५० कोटी रुपयांचे कर्जवाटप

          जालना - “राज्यातील एक लाख मराठा तरुणांना उद्योग, रोजगार तसे....

Read more