By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 29, 2020 07:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय गावी जाण्यासाठी निघाले आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेले कामगार, गरीब आणि हातावरचे पोट असणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी जनता किचन सुरु केले आहे. कांदिवली पश्चिम वॉर्ड क्रमांक 31 मध्ये हे जनता किचन सुरु करण्यात आले आहे.
मुंबईतील कांदिवली परिसरात लॉक डाऊनमध्ये अडकलेले कामगार, गरीब आणि हातावरचे पोट असणाऱ्यांसाठी जनता किचनची सुरुवात केली आहे. या जनता किचनमध्ये गरीबांसाठी फ्री जेवण आणि राहण्याची सोय केली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 4 पर्यंत हे जनता किचन सुरु राहणार आहे. भाजप नगरसेवक कमलेश यादवने या किचनची सुरुवात केली आहे.विशेष म्हणजे यात सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी या ठिकाणी तीन फूट अंतर ठेवून एक गोलाकार वर्तुळ केले आहे.
तसेच एका कुटुंबात 10 लोक असतील, तर एक व्यक्ती येऊनही तो संपूर्ण कुटुंबाचे जेवण घेऊन जाऊ शकतो. त्याशिवाय जो बेघर आहे किंवा मुंबई सोडून जाण्याचा विचार करत असल्यास त्यांना राहण्यासाठी जागाही उपलब्ध करुन दिली जाईल, असेही सांगितले जात आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबई कोरोनाचं प्रमुख लक्ष्य ठरली आहे. मुंबईत आज पुन्हा 5 रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त पुण्यात 1 आणि नागपूरमध्येही 2 कोरोना बाधित रुग्ण आढळला. आता महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 161 वर पोहचली आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
कोरोना व्हायरसने जगभरात कहर केलाय. सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्य....
अधिक वाचा