ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे निधन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2020 10:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे निधन

शहर : देश

भाजपचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह यांचे शनिवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अखेर सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझे ज्येष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सरदार तारा सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात मुंबई महानगरपालिकेतून झाली होती. त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते आमदार असा राहिला आहे. सरदार तारा सिंह हे महाराष्ट्राचे माजी आमदार होते. मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग अनेक वर्ष प्रतिनिधित्त्व केले होते. मुलूंड मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

२०१८ साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्ड च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला होता. प्रकृतीच्या कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. गेल्यावर्षी सरदार तारा सिंह यांचा मुलगा  रणजित सिंह याला मुंबई पोलिसांनी पीएमसी बँक घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली होती.

मागे

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत

कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हाती घेण्यात आलेली ....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू
कोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू

आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्र....

Read more