By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 06:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर भ्रष्टाचारी नंबर 1 असल्याचा आरोप केला होता. आता या आरोपाला काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. गुप्तहेर खात्याने माहिती दिल्यानंतर वारंवार विनंती करूनही सुरक्षा न देणारं व्ही. पी. सिंग सरकार राजीव गांधींच्या हत्येला जबाबदार असल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे. तर या सरकारला भाजपने पाठिंबा दिला होता अशी आठवणही पटेल यांनी करून दिली आहे.
’त्यांचे दरबारी त्यांना क्लीन नंबर 1 म्हणायचे पण, खरं तर राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर 1 होते’, असा आरोप मोदींनी मंगळवारी एका प्रचारसभेत केला होता. मोदींच्या या आरोपामुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला लागल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या विधानावरून मोदींचा चांगलाच समाचार घेतला होता. काँग्रेस पक्षानेही या टीकेचा निषेध केला आहे तर, आता काँग्रेस नेते अहमद पटेल यांनीही या वादात उडी घेतली आहे.
पंतप्रधान असताना राजीव गांधींनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर सहकुटुंब सुट्टीवर जाण्यासाठी केला होता असं मोदी म्हणाले होते. विराटचा अशा पद्धतीने वापर करणं ही राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड नव्हे का, असा सवालही मोदींनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देत राजीव गांधींच्या सुरक्षेचा मुद्दा पटेल यांनी उपस्थित केला आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावर वाकोला ब्रिज सर्व्हिस रोडवर आज सकाळी बेस्टची डबल ....
अधिक वाचा