ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनासोबत 'कसे जगायचे' हे शिकायला हवे, दीर्घकालीन Lockdown योग्य नाही – गडकरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2020 07:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनासोबत 'कसे जगायचे' हे शिकायला हवे, दीर्घकालीन Lockdown योग्य नाही – गडकरी

शहर : देश

देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे संकट आहे, असे असले तरी सातत्याने लॉकडाऊन  (Lockdown)करुन उपयोग होणार नाही. कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे, दीर्घकालीन लॉकडाऊन योग्य नाही. कोविड-१९ (Covid-19)या साथीच्या रोगापेक्षा दीर्घकालीन लॉकडाऊन गंभीर संकट निर्माण होईल. कोरोनाशी सामना करण्यासाठी त्याच्यासोबत जगायला शिकले पाहिजे, असा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिला.

भाजप नेते  (BJP Leader) नितीन गडकरी (Nitin Gadkari)  म्हणाले, लोकांची सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेत यांच्यामध्ये योग्य संतुलन निर्माण करण्याची गरज  आहे. कारण साथीच्या रोगाचा अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम झाला आहे. उपाशीपोटी कोणतेही तत्वज्ञान उपयुक्त नाही. कोविड -१९ बरोबर कसे जगायचे ते शिकले पाहिजे. एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, स्वतःचे रक्षण करणे आणि अर्थव्यवस्थेला गती देण्याचे संतुलन साधण्याची गरज आहे.

गडकरी यांनी मान्य केले की, कोरोनाव्हायरसमुळे राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक पेचप्रसंगाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि केंद्राचा महसूलही कमी झाला आहे. ते पुढे म्हणाले की दीर्घकाळ लॉकडाऊन कोविड -१९ साथीच्या रोगापेक्षा गंभीर संकट निर्माण करेलहे आपले वैयक्तिक मत आहे, असे सांगून ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे होणारा नफा आणि तोटा यावर प्रश्न विचारणे योग्य नाही.

लॉकडाऊन आवश्यक होते की नाही यावर चर्चा करणे योग्य नाही. त्यावेळी योग्य निर्णय घेण्यात आले. आपल्याला अनुभवातून शिकायला हवे. लॉकडाऊनवर राजकारण करण्याची गरज नाही. कोविड -१९  संकट आणि त्यानंतरच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार योग्य पाऊल उचलत आहेत, असे गडकरी म्हणाले.

मागे

एकाच दिवशी जन्म, एकत्र भरती, एकत्र ट्रेनिंग आणि एकाच आजाराने घात, जुळ्या पोलीस भावांचा कोरोनाने मृत्
एकाच दिवशी जन्म, एकत्र भरती, एकत्र ट्रेनिंग आणि एकाच आजाराने घात, जुळ्या पोलीस भावांचा कोरोनाने मृत्

एकाच दिवशी जगात पहिले पाऊल ठेवलेल्या जुळ्या भावंडांचा एकाच आजाराने बळी घेत....

अधिक वाचा

पुढे  

J-15 Jet | हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता, चीनचं J15 फायटर प्लेन सज्ज
J-15 Jet | हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता, चीनचं J15 फायटर प्लेन सज्ज

कर्ज देऊन छोट्या देशांना लूटणारा चीन, कपटानं इतरांच्या (China J15 Fighter Aircraft) जमिनी बळ....

Read more