ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना : वाढदिवसाला भाजप आमदाराकडून धान्याचं वाटप, गुन्हा दाखल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 06, 2020 11:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना : वाढदिवसाला भाजप आमदाराकडून धान्याचं वाटप, गुन्हा दाखल

शहर : नागपूर

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेत. सतत नागरिकांना घरात राहण्याच आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र असं असताना नेते मंडळीत लॉकडाऊन, संचारबंदीचे आदेश जुगारताना दिसत आहेत. वर्ध्याचे भाजप आमदार दादाराव कोचे यांनी आपल्या वाढदिवशी घरासमोर नागरिकांना रेशन वाटपाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्शिंगचे नियम पाळण्यात आले नाहीत. म्हणून आमदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

वर्धा जिल्ह्याचे उपविभागी अधिकारी हरिष धार्मिक यांच्यावर संचारबंदीच्या काळात धान्यवाटप केल्याप्रकणी कारवाई केली जाणार आहे अशी माहिती दिली होती. कोचेंविरोधात या विरोधात  सोशल डिन्सन्शिंग पाळल्यामळे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आमदार कोचे यांनी कोरोना व्हायरसमुळे असलेल्या लॉकडाऊनच्या काळात असा उपक्रम राबवण्याची कोणतीही अधिकृत माहिती घेत नसल्याचं अधिकारी सांगतात.

पोलीस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचण्याअगोदर आमदारांच्या घराबाहेर जवळपास १०० हून अधिक लोकांनी धान्य गोळा करण्यासाठी गर्दी केली होती. या व्हिडिओत आमदारांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा विचार करता वर्तूळाकार मार्क केले होते. मात्र लोकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेली सर्व खबरदारी बाजूला सारत गर्दी केली. आमदारांनी लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या वाढदिवसादिवशी स्थानिकांना धान्य वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र आता आमदार कोचेंकडून हा प्रकार नाकारण्यात येत आहे. असा कोणताच उपक्रम झाला नाही. आपल्याविरोधात हे 'राजकीय षडयंत्र' असल्याचं आमदार म्हणतात

या अगोदर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी संचारबंदी धाब्यावर बसवत आपल्या कुटुंबियांसोबत मुंबई ते बीड असा प्रवास केला. एवढंच नव्हे तर आमदार सुरेश धस यांनी देखील संचारबंदीचे नियम मोडले. म्हणजे जिथे सरकार नागरिकांना घरी राहण्याच आवाहन करत आहे तिथे सरकारची माणसं ही नेते मंडळी नियम मोडताना दिसत आहेत.

मागे

काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान
काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीर एकिकडे कोरोनाचा सामना करत आहे, तर दुसरीकडे दहशतवाद्यांना देखील चां....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनामुळे 'या' क्षेत्रातील २ लाखांहून अधिकजणांच्या नोकऱ्या धोक्यात
कोरोनामुळे 'या' क्षेत्रातील २ लाखांहून अधिकजणांच्या नोकऱ्या धोक्यात

कोरोना व्हायरसचा धोका वाढत असतानाच अनेक विभागांवर याचे थेट परिणाम पाहायला ....

Read more