ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'सरकार'वर निशाणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 01, 2020 09:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'सरकार'वर निशाणा

शहर : मुंबई

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा निर्बंध आणले आहेत. बुधवार रात्रीपासून मुंबईत पुन्हा कलम १४४ म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच सर्वसामान्य नागरिकांना मात्र आवश्यक कामांसाठी घराबाहेर फक्त २ किलोमीटरपर्यंतच्या अंतरातच प्रवास करता येणार आहे. या निर्णयानंतर भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

'महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे "भ्रमित ठाकरे" सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे. काय ते एकदा ठरवा, अर्थचक्र फिरवायचं का दोन किमीमध्येच फिरायचं? तातडीने निर्णय घ्या, जनतेचा संभ्रम दूर करा', अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मुंबईमध्ये बुधवार रात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. या कालावधीमध्ये पहाटे ५ ते रात्री ९ वाजता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामासाठी बाहेर पडण्याची मुभा असेल. तर, सर्वसामान्य नागरिकांना मात्र आवश्यक कामांसाठी घराबाहेर फक्त २ किलोमीटरपर्यंतच्या अंतरातच प्रवास करता येणार आहे. एक किंवा त्याहून अधिक व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.

        

मागे

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, १९८ जणांचा मृत्यू
राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, १९८ जणांचा मृत्यू

मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे ५,५३७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १९८ जण....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश; कलम १४४ लागू
मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश; कलम १४४ लागू

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाह....

Read more