ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एसीमध्ये बिघाड होऊन स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 04:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एसीमध्ये बिघाड होऊन स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू 

शहर : dombivli

सांगाव मानपाडा रोड येथे औषध निर्माण कंपनीत एसीमध्ये बिघाड झाल्याने अचनाक स्फोट झाला. यामध्ये 2 कामगार मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्घटना सांगाव मानपाडा रोड येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. यानंतर आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. कमलेश यादव आणि गिरीधर यादव अशी गंभीर जखमींची नावे आहेत. डॉर्टमुंड लॅबोरेटरीज प्रा. लि. ही कंपनी डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील प्लॉट नं. ए 1 येथे आहे. या कंपनीत औषध निर्मिती करण्यात येते. कंपनीमध्ये वातानुकुलीन यंत्रात बिघाड होऊन अचानक स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार  गंभीर जखमी झाले. या कामगारांना तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, हे कामगार दगावल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली. यासंदर्भात अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आवाजाने आसपासचे रहिवासी आणि दुकानदार भयभीत झाले होते. सदर कंपनीच्या तिसर्‍या मजल्यावरील वातानुकुलीन यंत्रातील ’कॉम्प्रेसर’मध्ये खासगी ठेकेदारामार्फत गॅस भरण्याचे काम सुरू होते. मात्र, घटनास्थळावर अधिक माहिती देण्यास कुणीही तयार नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक तायडे यांनी सांगितले.
 

मागे

जॉन्सन अँण्ड जॉन्सन कपंनीने केला खुलासा...
जॉन्सन अँण्ड जॉन्सन कपंनीने केला खुलासा...

जॉन्सन अँण्ड जॉन्सनच्या बेबी शाम्पूवर देशभरात बंदी आणण्यात आली आहे. तर, राष....

अधिक वाचा

पुढे  

कॅटवॉकदरम्यान ब्राजीलमधील एका मॉडेलचा मृत्यू 
कॅटवॉकदरम्यान ब्राजीलमधील एका मॉडेलचा मृत्यू 

फॅशन शोच्या दरम्यान अनेक मॉडेलसोबत कित्येकदा अनेक घटना घडल्याचे समोर आले आ....

Read more