ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुणे -मुंबई एक्सप्रेसवे 15 मिनिटे बंद; दरड काढण्याच्या कामाला सुरूवात 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 12:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुणे -मुंबई एक्सप्रेसवे 15 मिनिटे बंद; दरड काढण्याच्या कामाला सुरूवात 

शहर : मुंबई

जुन्या महामार्गाला जोडणार्‍या मार्गिकेवरील उर्से खिंडीत सुट्टे झालेल्या दरडी काढण्याचे काम मंगळवारपासून हाती घेण्यात आले आहे़. त्यामुळे या मार्गावर दर तासांनी 15 मिनिटे ब्लॉक घेतला जाणार असून वाहतूक थांबविण्यात येणार आहे. उर्से खिंडीतील दरडी निखळल्या आहेत़ पावसाळ्यात त्या कोसळून अपघात होऊ नये, म्हणून त्या उतरविण्यात येणार आहे़. हे काम दोन टप्प्यांमध्ये होणार असून पहिला टप्पा मंगळवार 14 ते ते शुक्रवार 17 मे आणि दुसरा टप्पा मंगळवार 21 मे ते गुरुवार 23 मे दरम्यान हे करण्यात येणार आहे़. 
या दिवशी प्रत्येक तासाला 15 मिनिटे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे़ द्रुतगती मागार्पासून जुन्या महामार्गाच्या दरम्यान उर्से खिंड येथून प्रवास करणार्‍या सर्व वाहन चालकांनी तसेच आजू बाजूच्या गावातील ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाने केले आहे़. 

मागे

नवर्‍याने शेंडी ठेवल्याने पत्नीने मागितला घटस्फोट
नवर्‍याने शेंडी ठेवल्याने पत्नीने मागितला घटस्फोट

भोपाळमध्ये एक अजबगजब प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचलं आहे. नवर्‍याने डोक्या....

अधिक वाचा

पुढे  

तिहार जेलमधील 150 हिंदू कैद्यांचा मुस्लिमांसोबत रोजा 
तिहार जेलमधील 150 हिंदू कैद्यांचा मुस्लिमांसोबत रोजा 

तिहार जेलच्या 150 हिंदू कैद्यांनी यंदा रोजा ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलन....

Read more