By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 02:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रत्नागिरी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मुरुड समुद्रकिनार्यावर आज सकाळच्या दरम्यान ग्रामस्थांना ब्ल्यु व्हेल मासा आढळून आला. ह्या ब्ल्यु व्हेलला पाहण्यासाठी समुद्र किनार्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
प्राणी तज्ज्ञ श्री. अभिनय केळस्कर यांच्या माहितीनुसार, ब्ल्यु व्हेल हा मासा साधारणता ३५ ते ४० फुटाचा असून तो पंधरा दिवसांपूर्वी समुद्रात मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच ब्ल्यु व्हेल या माशाच्या मृत्यू मोठ्या जहाजांना आपटून झाला असेल, किवा समुद्र प्रदूषणामुळे अथवा कुटुंबापासून दूर राहिल्याने झाला असावा, अशी माहिती त्यांनी दिली.
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा तात्काळ रद्द करण्यासंदर्भा....
अधिक वाचा