ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पालिकेचा धमाका, विनामास्क फिरणाऱ्या 8 लाख लोकांवर कारवाई, 17 कोटींचा दंड वसूल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2020 11:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पालिकेचा धमाका, विनामास्क फिरणाऱ्या 8 लाख लोकांवर कारवाई, 17 कोटींचा दंड वसूल

शहर : मुंबई

कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आर्थिक दंडाची कारवाई केल्यानंतर सोबत त्यांना एक मास्क विनामूल्य देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आता घेतला आहे. 20 एप्रिल ते 23 डिसेंबर या कालावधीत विना मास्क आढळलेल्या 8 लाख 20 हजार 167 नागरिकांवर कारवाई करुन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुमारे 16 कोटी 76 लाख 67 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

विना मास्क नागरिकांवर कारवाई:

मुंबई महानगरपालिकेने कोविड-19 अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता मार्च 2020 पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अंमलात आणलेल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आणि जरुरीचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विना मास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना 200 रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 24 विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, आतापर्यंत 8 लाख 20 हजार 167 नागरिकांवर कारवाई करून सुमारे 16 कोटी 76 लाख 67 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कारवाई नंतर मास्क मोफत:

मास्क लावता किंवा अयोग्य रीतीने लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकता देखील समजावून सांगितली जात आहे. मास्क नसल्यास दंड केल्यानंतर संबंधित नागरिक पुन्हा विना मास्क पुढे जातात. त्यामुळे मास्क वापराच्या मूळ उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मास्क देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरविला जात आहे. मास्क मोफत दिल्याची नोंद संबंधित दंडाच्या पावतीवर देखील केली जात आहे.(BMC collected fine of 17 cr. from citizens not wearing mask)

कारवाईसाठी पथक:

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 14 ऑक्टोबर 2020 रोजी बैठक घेऊन विना मास्क फिरणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयात यासाठी पथके तयार केली आहेत. या पथकात पर्यवेक्षक, कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, उपद्रव शोधक याच बरोबर विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. विना मास्क नागरिकांवर कारवाई करून दंड ठोठावण्याचे अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच क्लीन-अप मार्शल ही नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कार्यवाही अत्यंत महत्वाची ठरते आहे.

कोणत्या विभागात किती कारवाई:

झोन           व्यक्ती        दंड रुपये

झोन 1 – 1,16,765 – 2,39,23,500

झोन 2 – 1,50,572 – 3,04,45,700

झोन 3 – 1,06,737 – 2,26,32,400

झोन 4 – 1,26,334 – 2,58,16,200

झोन 5 – 93,918 – 1,90,00,300

झोन 6 – 1,11,538 – 2,23,51,000

झोन 7 – 1,14,312 – 2,34,98,500

एकूण – 8,20,167 – 16,76,67,600

 

मागे

SSC परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर
SSC परीक्षांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर

एस एस सीच्या परीक्षांसाठी २०२१ करता ऑनलाईन पध्द्तीने अर्ज (SSC Online Form) दाखल करण्....

अधिक वाचा

पुढे  

पीएम किसान सन्मान योजनेचा अपात्र शेतकऱ्यांना लाभ; सरकारकडून पैसे परत घेण्याची मोहीम
पीएम किसान सन्मान योजनेचा अपात्र शेतकऱ्यांना लाभ; सरकारकडून पैसे परत घेण्याची मोहीम

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू ....

Read more